Coronavirus Updates: मुंबईतील परिचारिका वसतीगृह बंद

मुंबईतील व्हॉकार्ट, जसलोक आणि भाटीया ही तीन नामांकित रुग्णालय सील करण्यात आली आहे. कोरोनाची लागण झाल्यानं या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच, ब्रीचकॅण्डी रुग्णालयात एका परिचारिकेलाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळते. त्यामुळं माहीम येथील परिचारिकांचं वसतिगृह बुधवारी प्रतिबंधित करण्यात आलं आहे.

कोरोनाची लागण झालेल्या सैफी रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञाने शस्त्रक्रिया केलेल्या दिवशी कामावर असलेला तंत्रज्ञाला करोनाची लागोण झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतर रुग्णालयातील हृदयरोग विभाग २७ मार्चला बंद करून आपात्कालीन सेवा सुरू ठेवल्या होत्या.

काही दिवसांपूर्वी रुग्णालयातील एका परिचारिकेलाही लक्षणं आढळून आल्यानं तिची तपासणी केली होती. मंगळवारी तिची चाचणी सकारात्मक आल्यानंतर तिला रात्रीच्या सुमारास रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. परिचारिका माहीम येथील रुग्णालयाच्या वसतिगृहात राहत असल्यानं हे वसतिगृह प्रतिबंधित करण्यात आलं आहे.

या वसाहतीगृहामध्ये १७६ परिचारिका असून यांची चाचणी बुधवारी करण्यात येणार असून यातील सकारात्मक चाचणी आलेल्यांना रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. परिचारिकेच्या संपर्कात आलेल्या अजून ९० कर्मचाऱ्यांच्या चाचण्या सुरू आहेत. जसलोक रुग्णालयातील करोनाबाधित २१ परिचारिकांपैकी १६ जणांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केले आहे. एका रुग्णाला कस्तुरबामध्ये मंगळवारी पाठविले आहे, तर ४ जणांवर जसलोकमध्येच उपचार सुरू आहेत.


हेही वाचा -

मुंबईतील भाटिया रुग्णालयही सील

राज्यात ७ दिवसांत 'इतकं' क्विंटल धान्याचं वाटप


पुढील बातमी
इतर बातम्या