ऑनलाइन औषध विक्रीच्या निषेधार्थ औषध विक्रेत्यांचा मोर्चा

  • मुंबई लाइव्ह टीम & सोनाली मदने
  • आरोग्य

अापल्या मागण्यांसाठी मुंबई केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या पाचशेपेक्षा जास्त औषध विक्रेत्यांनी सोमवारी दुपारी मुंबई येथील वांद्रे येथील एफडीए कार्यालयासमोर धडक मोर्चा काढला. भर पावसात एफडीएच्या कार्यालयासमोर औषध विक्रेत्यांनी घोषणाबाजी केल्या.

औषध आणि सोंदर्य प्रसाधन कायद्यानुसार डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनेच आणि फार्मासिस्टच्या उपस्थितच औषध विक्री करणं बंधनकारक आहे. तर या कायद्याचा भंग करणाऱ्याविरोधात कडक कारवाईची तरतूद कायद्यात आहे. असं असताना केंद्र सरकार ऑनलाइन औषध विक्रीस परवानगी देण्याच्या तयारीत आहे. सरकारने ऑनलाइन औषध विक्रीस परवानगी देऊ नये असं या औषध विक्रेत्यांच म्हणणं अाहे.

नशावर्धक गोळ्या खरेदीचा धोका

ऑनलाईन फार्मसीमध्ये डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नसल्यामुळे कोणत्याही गोळ्या अगदी सहजरित्या खरेदी केल्या जाऊ शकतात. यामध्ये चुकीची गोळी खाल्ल्याने जीवावरदेखील बेतू शकते.त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा यासाठी अाम्ही हा मोर्चा काढत आहोत असं केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे पारसिक घाडगे यांनी सांगितलं. ऑनलाईन फार्मसीमुळे राज्यात ८ लाख औषध विक्रेत्यांची दुकाने आणि या दुकानात काम करणाऱ्या ४० लाख कर्मचाऱ्यांवरदेखील परिणाम होणार असल्याचं औषध विक्रेत्यांंच म्हणणं अाहे. 


हेही वाचा -

धक्कादायक! मुंबईत वर्षभरात दगावली ४८३ बालकं

मुंबईत लेप्टोचा चौथा बळी


पुढील बातमी
इतर बातम्या