Advertisement

मुंबईत लेप्टोचा चौथा बळी


मुंबईत लेप्टोचा चौथा बळी
SHARES

मुंबईत लेप्टोस्पायरोसीस आजाराने चौथा बळी घेतल्याने एकच खळबळ मजली आहे. आतापर्यंत कुर्ला, गोवंडी, मालाड आणि अाता सायन परिसरातील रुग्णाला लेप्टोमुळे आपला जीव गमवावा लागला आहे.



कधी झाली लागण?

सायन प्रतीक्षानगर इथं राहणारे ४२ वर्षीय देवानंद तायडे यांना १० जुलै रोजी लेप्टोची लागण झाल्याचं त्यांच्या मेडिकल रिपोर्टद्वारे कळलं. त्यांच्यावर मुंबईतील सोमय्या रुग्णालयात उपचार सुरू होते, पण उपचारादरम्यान त्यांचा रविवारी रात्री मृत्यू झाला.



धोका वाढतोय

मुंबईत लेप्टोचा धोका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सायन रुग्णालयात लेप्टोमुळे तीन जणांचा मृत्यू झाल्यानंतर खडबडून जाग आलेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्या युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम हाती घेतली होती.

ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही किंवा कित्येक दिवस पावसाचे दूषित पाणी साचून राहते. त्या पाण्याच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना लेप्टोचा अधिक धोका असतो. त्यामुळे मुंबईकरांनी घाण पाण्यातून चालणं टाळावं, असं आवाहन महापालिकेने केलं आहे.



हेही वाचा-

रुग्णांनो, टेन्शन नाॅट, शस्त्रक्रियेचा खर्च 'असा' येणार नियंत्रणात!

लेप्टोने आतापर्यंत घेतले तीन बळी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा