नवी मुंबईत कोरोनाचा आणखी एक बळी

नवी मुंबईत आता कोरोनाचा आणखी एक बळी गेला आहे. नेरूळमधील एका ७३ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे नवी मुंबईतील कोरोना बळींची संख्या 2 वर गेली आहे. याशिवाय नवी मुंबईत कोरोनाचे 3 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे येथील रुग्णांची संख्या आता २८ वर पोहोचली आहे.

नेरूळमधील मृत व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली. त्यांनतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. तपासणीमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं होतं. उपचार सुरू असताना या व्यक्तीचा मृत्यू झाला.  घणसोलीमध्ये 1 आणि नेरूळमध्ये 2 असे 3 नवीन करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. नेरूळ येथील एका तरुणाला लागण झाली आहे. हा तरुण सध्या गावी असून, त्याच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ७81 वर गेली आहे. मुंबईत रविवारी 103 नवे रूग्ण आढळले. रविवारी मृत्युमुखी पडलेल्या आठ रुग्णांपैकी सहा जणांना दिर्घकालीन आजार होता. या सर्व मृतांचे वय ५२ ते ७७ वष्रे यादरम्यान होते. रविवारी राज्यात कोरोनाने १३ बळी घेतले. त्यामुळे राज्यातील कोरोनाबळींची संख्या ४५ वर पोहोचली. गेल्या चोवीस तासांत करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत ४७२ ने वाढ झाली असून, देशभरात एकूण रुग्णसंख्या ३३७४ वर पोहोचली आहे. देशात एकूण ७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा

'साराभाई Vs साराभाई' आणि 'खिचडी' तुम्हाला पुन्हा हसवणार

Coronavirus : अखेर कनिका कपूरची सहावी टेस्ट निगेटिव्ह


पुढील बातमी
इतर बातम्या