वन रुपी क्लिनिककडून वृद्ध रुग्णांना घरपोच सेवा

अनेकदा आरोग्य तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयात बरीच वाट पाहावी लागते. तपासण्या उशिरा झाल्यामुळे उपचारही उशिरा सुरू होतात. शिवाय, खासगी रुग्णालयात तपासणी करायचं म्हटलं, तर ती सर्वसामान्यांना परवडणारी नसते. यामुळे बरेच जण तपासणी करणं टाळतात. याच पार्श्वभूमीवर 'वन रुपी क्लिनिक'ने सीटीस्कॅन, एमआरआय, अल्ट्रा सोनोग्राफी करणाऱ्या रुग्णांना घरपोच सेवा सुरू केली आहे. या सुविधेमुळे रुग्णांना चाचण्यांसाठी वेळेत पोहचता येणं शक्‍य होणार आहे.

इथे उपचार स्वस्तात

नागरिकांच्या आरोग्याकरता दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. पण सरकारी रुग्णालयात सिटीस्कॅन, एमआरआय, अल्ट्रा सोनोग्राफी या महत्त्वाच्या तपासणीकरता तीन-चार महिने थांबावे लागते. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना खासगी दवाखान्यामध्ये जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. तेथेही महागड्या दरात या चाचण्या केल्या जातात.

रुग्णसेवेचे हित डोळ्यासमोर ठेऊन वन रुपी क्‍लिनिकने या चाचण्या बाजारभावापेक्षा कमी दरात सुरू केल्या आहेत. कित्येकदा रुग्णांना वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. वेळेत पोहचता न आल्याने त्यांना पुन्हा कित्येक तास थांबावे लागते. पण आता यातून ज्येष्ठ नागरिकांची सुटका होणार आहे. वन रुपी क्‍लीनिकने ज्येष्ठ नागरिक रुग्णांकरता घरपोच सेवा सुविधा सुरू केली आहे.

डॉ. राहुल घुले, संचालक, वन रुपीे

ही सेवा मुंबईत 24 तास सुरू असणार आहे.

या नंबरवर द्या मिस्ड कॉल

जर तुम्हाला तातडीने एमआरआय किंवा सिटीस्कॅन तपासणी करून घ्यायची असल्यास तु्म्ही ८൦३൦६३६१६६ या नंबरवर मिस्ड कॉल देऊ शकता. तुमच्या मिस्ड कॉलनंतर तुमच्याशी संपर्क करून तुमचे सर्व डिटेल्स घेतले जातील आणि तुमच्या घरापर्यंत वन रुपी क्लिनिकचे असिस्टंट असलेली एक रुग्णवाहिका पोहोचेल. तुम्हाला तिथून त्यांच्या एमआरआय क्लिनिकपर्यंत नेलं जाईल. ही सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

गरीब आणि वृद्धांनी या नंबरवर मिस्ड कॉल दिल्यानंतर सिटीस्कॅन, एमआरआय, युसीजी आणि पिकअप सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

शिवाय, ३൦ ते ४൦ टक्क्यांपेक्षा जास्त पैशांची बचत वन रुपी क्लिनिकमध्ये एमआरआय, सिटीस्कॅन केल्यामुळे होणार असल्याचं वन रुपी क्लिनिकचे संचालक डॉ. राहुल घुले यांनी सांगितले.


हेही वाचा

जखमी आरपीएफ पोलिसावर वन रुपी क्लिनिकमध्ये प्रथमोपचार

पुढील बातमी
इतर बातम्या