Advertisement

जखमी आरपीएफ पोलिसावर वन रुपी क्लिनिकमध्ये प्रथमोपचार


जखमी आरपीएफ पोलिसावर वन रुपी क्लिनिकमध्ये प्रथमोपचार
SHARES

घाटकोपर स्थानकात ड्युटीवर असलेले आरपीएफ जवान धनंजय कुमार (29) यांच्या कपाळावर अचानक लोखंडी तुकडा लागला. या घटनेत त्यांच्या डोक्यावर मार बसल्याने ते जखमी झाले. रविवारी संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्र. 4 वर ही घटना घडली.

या जवानावर तात्काळ घाटकोपरच्या वन रुपी क्लिनिकमध्ये जाऊन उपचार करण्यात आले. वन रुपी क्लिनिकचे डॉ. सनी यांनी त्यांच्यावर औषधोपचार केले. आता त्यांची प्रकृती ठीक असल्याचे वन रुपी क्लिनिकचे प्रमुख डॉ. राहुल घुले यांनी सांगितले.


रक्तचाचणीही उपलब्ध होणार माफक दरात

खासगी किंवा पालिका रुग्णालयात रक्त चाचण्यांसाठी अधिक पैसे भरावे लागतात. पण, आता ही सेवा देखील वन रुपी क्लिनिकतर्फे कमी म्हणजेच माफक दरात उपलब्ध होणार आहे. पुढच्या 15 ते 20 दिवसांत ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे वन रुपी क्लिनिकचे प्रमुख डॉ. राहुल घुले यांनी सांगितले आहे.


मध्य रेल्वेप्रमाणे पश्चिम रेल्वेवरही सेवा सुरू करणार?

मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या आणि गर्दीच्या स्थानकांवर वन रुपी क्लिनिकची सेवा सुरू करण्यात आली आहे. पण, अशीच सेवा पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर सुरू करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव पश्चिम रेल्वेच्या डीआरएम यांना पाठवण्यात आला आहे. अजून त्या प्रस्तावाला प्रत्युत्तर आले नसल्याचे डॉ.घुले यांनी ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना सांगितले.


हेही वाचा - 

धावत्या लोकलवर दगडफेक, जखमी महिलेवर वन रुपी क्लिनिकमध्ये उपचार


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा