धावत्या लोकलवर दगडफेक, जखमी महिलेवर वन रुपी क्लिनिकमध्ये उपचार


धावत्या लोकलवर दगडफेक, जखमी महिलेवर वन रुपी क्लिनिकमध्ये उपचार
SHARES

चालत्या लोकलवर दगडफेक झाल्याने एक महिला प्रवासी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर चेंबूर ते गोवंडी स्थानकादरम्यान अज्ञात व्यक्तीने लोकलवर दगड भिरकावला. हा दगड महिला डब्यात दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या अश्विनी शेरे यांच्या डोक्याला लागल्याने त्या जखमी झाल्या. त्याचवेळी महिला डब्यातील काही इतर महिलांनी त्यांना वाशी येथील वन रुपी क्लिनिकमध्ये नेले. तिथे डॉ. अनु कोल यांनी त्यांच्यावर उपचार केले.


पोलिसांत गुन्हा दाखल

गर्दीची वेळ असल्यामुळे 61 वर्षांच्या अश्विनी शेरे कुर्ल्याहून सीवूडला आपल्या घरी जात होत्या. त्या महिला डब्याच्या दरवाजाजवळ उभ्या होत्या. त्यावेळी चालत्या लोकलवर अचानक कुणीतरी दगडफेक केली. तो दगड त्यांच्या डोक्यालाच लागल्याने त्या जखमी झाल्या. चेंबूर ते गोवंडीदरम्यान हा प्रकार घडला.

या प्रकरणी वाशी जीआरपी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शुक्रवारी घडलेल्या या प्रकारामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.



हेही वाचा - 

पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या कुटुंबाला अटक


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा