पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या कुटुंबाला अटक


पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या कुटुंबाला अटक
SHARES

वडाळा - एका सराईत दरोडेखोराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दरोडेखोरांच्या कुटुंबीयांनी दगडफेक करून एका पोलीस शिपायाला जखमी केल्याची धक्कादायक घटना वडाळा पूर्व येथील म्हाडा ट्रान्झिस्ट कॅम्प परिसरातील कोकरी आगार येथे शनिवारी घडली. या प्रकरणी वडाळा टी टी पोलिसांनी एका दरोडेखोरासह त्याच्या कुटुंबातील तिघांना अटक केली असून, त्यांच्या जवळून एक तलवार जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.
शुक्रवारी रात्री कोकरी आगार परिसरातून घराकडे निघालेल्या इसमाला तलवारीचा धाक दाखवून मोबाईल आणि रोकड लुटल्याची खबर वडाळा टीटी पोलिसांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश लिंगे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि रात्रीच्या अंधारात लूटमार करून पसार झालेल्या मोहम्मद शेखला मोठ्या शिताफीने अटक केली. दरम्यान कसून चौकशी केली असता पोलीस अभिलेखावर असलेला आरोपी उमेश वाघमारे या घटनेत सामील असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शनिवारी सकाळी सपोनि. प्रकाश लिंगे यांनी आपल्या पथकासह आरोपीच्या घरावर छापा टाकला असता आरोपीचा कुटुंबीयांनी पोलिसांशी अरेरावी करून हुज्जत घातली. त्यावेळी घरात लपून बसलेल्या उमेशला पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता संतापलेल्या कुटुंबीयांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा