Advertisement

वन रुपी क्लिनिक पुरवणार शस्त्रक्रियेची सेवा


वन रुपी क्लिनिक पुरवणार शस्त्रक्रियेची सेवा
SHARES

मुंबईकरांना एक रुपयात वैद्यकीय सेवा देणाऱ्या वन रुपी क्लिनिकने आणखी एक विशेष सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. आता कमी खर्चात शस्त्रक्रियेची सेवाही वन रुपी क्लिनिककडून देण्यात येणार आहे. सध्या हा प्रस्ताव प्रायोगिक तत्वावर असल्याचं वन रुपी क्लिनिकचे प्रमुख डॉ. राहुल घुले यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना स्पष्ट केलं आहे.

खासगी किंवा मोठ-मोठ्या क्लिनिकमध्ये अति खर्चात होणाऱ्या शस्त्रक्रिया वन रुपी क्लिनिकमध्ये निम्म्या किंमतीत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यासाठी त्यांच्याकडे काही रुग्णालयातील चॅरिटी ट्रस्टकडून प्रस्ताव आल्याचंही डॉ. घुले यांनी सांगितलं.

शिवाय, भांडुप पश्चिममधील एका रुग्णालयात गेल्या आठवड्यापासून ही सेवा सुरू देखील करण्यात आली आहे. राज्यातील पुणे आणि लातूर या जिल्ह्यांमध्येही सेवा देण्यात येणार असल्याचं डॉ. राहुल घुले म्हणाले.

हा प्रस्ताव अजून प्रायोगिक तत्वावर आहे. खासगी आणि मोठ्या क्लिनिकमध्ये शस्त्रक्रियेसाठी खूप पैसे आकारले जातात. त्या तुलनेत आम्ही निम्म्या किंमतीत शस्त्रक्रिया करुन देणार आहोत. 

डॉ. राहुल घुले, मुख्य कार्यकारी अधिकारी, वन रुपी क्लिनिक

मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात खूप पैसे घेतले जातात. पण, वन रुपी क्लिनिक ही सेवा अँजिओग्राफी, मोतीबिंदू, प्रसूती, अॅपेंडिक्स, किडनीस्टोन, पाइल्स अशा शस्त्रक्रिया निम्म्या किंमतीत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शिवाय, 15 दिवसांपूर्वी वन रुपी क्लिनिकने मानसिक आजारावरही सल्ला देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

वन रुपी क्लिनिक ही सेवा आधी मुंबईतील मोठ्या स्टेशन्सवर सुरू करण्यात आली होती. पण, आता या सेवेचा विस्तार होऊन ही सेवा भारतभर पसरवण्याचा आपला मानस असल्याचं डॉ. घुले यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना स्पष्ट केलं.



हेही वाचा

फार वेळ उभं राहू नका! नाहीतर व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होईल!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा