Advertisement

फार वेळ उभं राहू नका! नाहीतर व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होईल!


फार वेळ उभं राहू नका! नाहीतर व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होईल!
SHARES

आपण बऱ्याचदा अनेक तास मित्र-मैत्रिंणीची वाट बघत उभे असतो किंवा तासन् तास उभं राहून काम करतो. पण, याचा परिणाम नकळत आपल्या पायांवर होत असतो. 10 ते 12 तास उभं राहून काम केल्यानंतर पायांमध्ये थोड्या वेदना सुरू होतात. शिवाय, किंचित सूज चढते आणि अनेकदा आपण या लक्षणांना थकवा किंवा अशक्तपणा असल्याचं लेबल देऊन चुकीचं निदान करतो.

यावर उपाय म्हणून अनेकदा पेनकिलरही खातो. पण, कधी कधी ही पायांना आलेली सूज 'व्हेरीकोज व्हेन्स' या आजाराची सुरुवात असू शकते.


'व्हेरीकोज व्हेन्स' म्हणजे काय?

व्हेरीकोज म्हणजे विस्तारलेल्या, गुंतलेल्या किंवा गाठाळलेल्या आणि व्हेन्स म्हणजे हृदयाकडे अशुद्ध रक्त् वाहून नेणाऱ्या शिरा. या शिरांचे जाळे संपूर्ण शरीरभर पसरलेले असले, तरी त्या विस्तारणे, गाठाळणे हे सहसा पायांच्या शिरांच्या बाबतीत घडते आणि यालाच 'व्हेरीकोज व्हेन्स' असं म्हणतात.

या आजारात पायावरच्या शिरा अनिर्बंधपणे मोठ्या होतात. अशुद्ध रक्त हृदयाकडे नेणाऱ्या झडपांमधल्या बिघाडामुळे किंवा पोटरीच्या स्नायूंच्या अकार्यक्षमतेमुळे ही समस्या उद्भवते. हे रक्त शिरेमध्ये साचते. त्यामुळे पायाला सूज येते. ठणका बसतो. रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याने घोट्याजवळ सूज येते. त्यावर योग्य वेळी उपचार करण्यात आले नाहीत, तर रुग्णाला चालणंही त्रासदायक होतं.  शिवाय, पाय दुखतात म्हणून औषध घेतो असं सांगणाऱ्या रुग्णांना पहिली चार ते पाच वर्ष 'व्हेरीकोज व्हेन्स' हा आजार झाला आहे हेच कळत नाही.

जास्त वेळ उभं राहून काम करणारा वर्ग म्हणजेच ट्रॅफिक पोलीस, सुरक्षा रक्षक, शिक्षक, फेरीवाले तसंच रोजगारावर काम करणारे हमाल अशा लोकांमध्ये वयाच्या चाळीशीमध्येच 'व्हेरीकोज व्हेन्स'चा त्रास सुरू होतो. भारतामध्ये सध्या 'व्हेरिकोज व्हेन्स' या आजाराचं प्रमाण वाढत आहे 

डॉ. विक्रम चव्हाण, व्हेरीकोज व्हेन्स तज्ज्ञ, वोक्हार्ट हॉस्पिटल

शिवाय, लठ्ठपणा, अती घट्ट कपडे वापरणे, अनुवांशिकता, संततीनियमनाच्या गोळ्या, गर्भावस्था यामुळेही हा त्रास उद्भवू शकतो. भारतात सुमारे 40 टक्के महिला आणि 25 टक्के पुरुषांना 'व्हेरीकोज व्हेन्स'चा त्रास असल्याचं निदर्शनास आलं आहे. हा त्रास शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. मात्र,  प्रामुख्याने पायांवर 'व्हेरीकोज व्हेन्स'चा परिणाम होतो, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.



हेही वाचा

रक्त घेताय? मग नॅट तपासणी कराच...


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा