Advertisement

मानसिक आजारानं त्रस्त आहात? 'वन रुपी क्लिनिक'मध्ये या...


मानसिक आजारानं त्रस्त आहात? 'वन रुपी क्लिनिक'मध्ये या...
SHARES

मुंबईत आजारांचं वाढतं प्रमाण आहे. मग, ते शारिरीक असो किंवा मानसिक आजार... शारीरिक आजारांसाठी आपण जनरल फिजीशियनकडे जातो. पण, मानसिक आजारांसाठी मानसोपचारतज्ज्ञांकडं जावं लागतं. त्यासाठी खूप खर्चही येतो. आता हीच मानसिक आरोग्यसेवा मुंबईकरांना कमी खर्चात उपलब्ध व्हावी यासाठी वन रुपी क्लिनिक प्रयत्नशील आहे.

सोमवारपासून ही सेवा मानसिक आजारानं त्रस्त असणाऱ्या रुग्णांना उपलब्ध झाली आहे. कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, मानखूर्द आणि वाशी या क्लिनिकमध्ये ही सेवा संध्याकाळी ४ ते ६ च्या दरम्यान उपलब्ध होणार आहे. 



नैराश्य, एकटेपणा, भीती, व्यसनाधीनता आणि मानसिक आरोग्य या संबंधित आजार असलेल्या रुग्णांना वैद्यकीय सल्ला आणि सुविधा फक्त एक रुपयांत वन रुपी क्लिनिकमध्ये उपलब्ध होणार आहे. घाटकोपरच्या क्लिनिकपासून या सुविधेला सुरुवात झाली आहे.

या उपक्रमासाठी मानसोपचारतज्ज्ञ आणि डिअॅडिक्शन फ्री मुंबई असोसिएशनच्या डॉ. स्नेहा आर्या यांचा सहभाग लाभला आहे. त्यांच्या साथीला मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा हे देखील या उपक्रमाचा सर्व कारभार सांभाळणार असल्याचं वन रुपी क्लिनिकचे प्रमुख डॉ. राहुल घुले यांनी सांगितलं.


आजपासून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. आज संध्याकाळी ४ ते ६ च्या दरम्यान जवळपास घाटकोपर येथील क्लिनिकमध्ये १० ते १२ रुग्ण तपासणीसाठी आले होते. शिवाय, हे सर्व रुग्ण व्यसनाधीन होते. त्यांना आम्ही सल्ला दिला. 

डॉ. राहुल घुले, प्रमुख, वन रुपी क्लिनिक




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा