व्यसन आणि गैरसमज


व्यसन आणि गैरसमज
SHARES

मुंबईच्या अंबोलीमध्ये झालेल्या मॉडेल कृतिका चौधरीच्या हत्येनंतर अनेक गूढ उकलले जात आहेत. त्यातीलच एक म्हणजे कृतिका ही एमडी या मादक पदार्थाचे सेवन करत होती. तिच्याप्रमाणेच बऱ्याच मॉडेल आणि अभिनेत्री अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे गैरसमजुतीतून या मॉडेल ड्रग्जचे सेवन करत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षांत एमडी हा अमली पदार्थ कमालीचा चर्चेत आला आहे. एमडीच्या आहारी गेलेले तरुण चित्रपटसृष्टी, मॉडेलिंगविश्वात मोठ्या संख्येने आढळतात. नैराश्य, अनियमित काम, तणाव, ब्रेकअपसारख्या अनेक कारणांमुळे ग्लॅमरविश्वातले तरुण-तरुणी एमडीकडे वळतात. पण यापलीकडचे आणखी एक कारण ऐकाल तर तुम्ही थक्क व्हाल. एमडी म्हणे शरीरासाठी उपयुक्त आहे. तरुणांना 'प्रिंस चार्मिंग' आणि तरुणींनाच 'मिस ब्युटीफुल' बनवण्याच्या कामात एमडीची मोलाची भूमिका आहे.


नेमके काय आहेत गैरसमज?

  • एमडीसारख्या अनैसर्गिक ड्रग्जने बारीक होणे.
  • चित्रपटक्षेत्रात काम करणाऱ्या बहुसंख्य अभिनेत्रींना वाटतं की त्या ड्रग्ज घेऊन सुडौल होतील.. 
  • एमडी हे थेट तुमच्या पचन संस्थेवर मारा करते.
  • एमडीमुळे भूक मंदावते आणि तुम्ही बारीक होता.


एमडीचं वास्तव

  • काही महिन्यांतच एमडी आपलं खरं रुप दाखवायला सुरुवात करतो. 
  • सडपातळ होण्यासाठी सुरु केलेलं एमडी तुमच्या शरीराचा फक्त सांगाडाच शिल्लक ठेवत आहे, हे कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. 
  • ड्रग्जच्या सेवनाने शरीर गळपटते, चेहरा आक्रसतो आणि चेहऱ्यावर म्हातारपण येते.
  • मग मेकअपचा भडिमार हा एकच पर्याय उरतो.

काही पुरुष अभिनेते हे फक्त भूमिकेत हरवून जाण्यासाठी ड्रग्जचे सेवन करतात. तर, कित्येक अभिनेते हे निव्वळ नशा म्हणून आणि झोप लागण्यासाठी ड्रग्ज घेतात. याआधी देखील अनेक मोठे अभिनेते अंमली पदार्थांसह पकडले गेलेत. काही अभिनेत्यांनी तर, आपण ड्रग्ज घेत असल्याचे मान्य केले आहे.

सिनेसृष्टीव्यतिरिक्त सामान्यांमध्येही ड्रग्जबद्दल अनेक ग़ैरसमजूती आहेत. याच गैरसमजुतीपोटी हे व्यसन शाळकरी मुलांपर्यंत पोहचल्याचे ऐकून तुम्हाला धक्काच बसला असेल.


का घेतात मुले ड्रग्ज?

अभ्यास चांगला व्हावा, परीक्षेच्या वेळी झोप येऊ नये म्हणून शाळकरी मुलांनी अंमली पदार्थांची मदत घेतल्याचे समोर आले आहे. ड्रग्जच्या अशा वापराने अभ्यासात तर लक्ष लागत नाहीच, पण जगण्याची इच्छाही संपून जाण्यास वेळ लागत नाही.


व्यसन म्हणजे व्यवस्थित समाप्तीची नशा. व्यसनाच्या आहारी जाण्याची अनेक कारणे आहेत. पण सगळ्याच व्यसनांचा परिणाम हा वाईटच होतो. त्यामुळे जास्तीत जास्त जनजागृती करण्याची गरज आहे.

- रमेश सांगळे, समन्वयक, मिरॅकल फाउंडेशन व्यसनमुक्ती संस्था



फक्त सिनेसृष्टीतच ड्रग्ज घेतले जातात असे नाही. आता तर लहान मुलेही अगदी फॅशन म्हणून ड्रग्ज सेवन करतात. ड्रग्ज हे कृत्रिम रसायन आहे. जे बहुतांश वेळा उत्सुकता वाढवण्यासाठी, आनंद वाढवण्यासाठी, नैराश्य घालवण्यासाठी घेतले जाते. ज्याचा परिणाम सगळ्यात जास्त आपल्या मेंदूवर होतो. आपल्या मेंदूच्या पेशी काम करणे कमी करतात. त्यामुळे आपली विचार करण्याची क्षमता कमी होते. जे ड्रग्जचे सेवन करतात त्यांना ती नशा होते. पण, एकदा ड्रग्ज घेतल्यावर त्यांना आपण काय करतो, काय नाही याचा विसर पडतो. त्यामुळे मेंदू आणि शरीर या दोघांवरही ड्रग्जचा खूप वाईट परिणाम होतो.

- डॉ. नुतन लोहिया, मानसोपचार तज्ज्ञ,वोक्हार्ट हॉस्पिटल


हेही वाचा - 

ड्रग्ज तस्करी प्रकरणी 'सपा' नेत्याच्या पुतण्याला अटक

ड्रग्जची सवय लावण्यासाठी माफियांची अनोखी शक्कल



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा