कोरोना बाधित आई बाळाला दुध पाजू शकते का? अशी 'घ्या' खबरदारी

कोरोनानं सगळ्यांच्या मनावर एक भीतीचं सावट निर्माण केलं आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत मनात शंका निर्माण होत आहे. त्यातच कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या गर्भवती महिलेकडून तिच्या होणाऱ्या बाळाला कोरोनाची लागण होते का? कोरोना पॉझिटिव्ह आईनं स्तनपान करताना काय काळजी घ्यावी?  अशावेळी काय करता येऊ शकतं? यासंदर्भातच आम्ही माहिती देणार आहोत.

  • आई पॉझिटिव्ह आल्यानंतरही स्तनपान सुरू ठेवावं, असं अनेक डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. कारण लहानशा धोक्याच्या तुलनेत बाळाला स्तनपानाद्वारे मिळणाऱ्या पोषणाचे फायदे कित्येक पटींनी जास्त आहेत.
  • दुध देण्यात अडथळा असेल तर स्वतःचा ब्रेस्ट पंप ठेवावा. आईनं स्वतःचे दुध बाळाला पाजणंच आवश्यक आहे. शक्य न झाल्यास आईचं काढून ठेवलेलं दुध द्यावं.
  • आईने बाळाला दूध पाजून त्याला परत खोलीबाहेर आजी-आजोबा वा इतर कुटुंबियांकडे देताना, संसर्ग घरातल्या ज्येष्ठांमध्ये पसरण्याची शक्यता जास्त आहे.
  • नवजात बाळाला जवळ घेण्याआधी साबण पाण्यानं किंवा सॅनिटायझरनं हात निर्जंतुक करावे. प्रत्येक स्तनपानापूर्वी साबण आणि भरपूर पाण्यानं स्तन स्वच्छ करावेत, मास्क कायम लावावाच.
  • स्तनपान देताना आईने नाक आणि तोंड संपूर्ण झाकणारा व्यवस्थित मास्क घालावा. खोकला किंवा शिंक आल्यास बाळापासून तोंड बाजूला करणं.
  • लहान बाळांना मालिश करायला बाहेरून येणारी मालिशवाली संसर्गाचं माध्यम ठरू शकते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने काही काळ घरच्या घरीच बाळांना मालिश करा.
  • लहान मुलांचे साबण, कंगवे आणि इतर गोष्टी वेगळ्या ठेवा.
  • लहान बाळांना दूध पाजताना, अन्न भरवताना, कपडे बदलण्याआधी हात स्वच्छ धुवून घ्या.
  • कारचा वापर करत असल्यास कार वेळोवेळी सॅनिटाईझ करून घ्या.
  • मुलांची खेळणी सॅनिटाईझ करा.
  • मुलांनी पुरेसा वेळ हात धुवावेत यासाठी लहान मुलांना हात धुताना दोनदा 'हॅपी बर्थडे' गायला सांगा.
  • मुलांना थेट मल्टी व्हिटॅमिनची औषधं वा प्रोटीन पावडर देऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने पूरक औषधं सुरू करा. कारण औषधांचं हे प्रमाण मुलांच्या वयाप्रमाणे आणि वजनाप्रमाणे बदलतं.


हेही वाचा

कोविड रुग्णांना दिला जाणारा ऑक्सिजन कसा आणि कुठे बनतो? जाणून घ्या

लहान मुलांमध्ये वाढतोय मल्टीसिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोम, जाणून घ्या 'या' आजाराबद्दल

पुढील बातमी
इतर बातम्या