Advertisement

लहान मुलांमध्ये वाढतोय मल्टीसिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोम, जाणून घ्या 'या' आजाराबद्दल

लहान मुलांमध्ये मल्टीसिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोम हा आजार वाढत आहे. कोरोना होऊन गेल्यानंतर या आजाराची लक्षणं बहुुतांश लहान मुलांमध्ये दिसून येत आहे.

लहान मुलांमध्ये वाढतोय मल्टीसिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोम, जाणून घ्या 'या' आजाराबद्दल
SHARES

नवीन कोरोनाव्हायरसमुळे लहान मुलांना MIS - C म्हणजे मल्टीसिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन असा गंभीर आजार उद्भवत आहे. आता, संशोधनात असं आढळून आलं आहे की, या तरूण रूग्णांना वारंवार होणाऱ्या श्वसन समस्यांसह न्यूरोलॉजिकल लक्षणे देखील विकसित होत आहेत.

MIS – C म्हणजे काय?

कोव्हिड १९ होऊन गेल्याच्या २ ते ४ आठवड्यांनंतर लहान मुलांमध्ये या सिंड्रोमची लक्षणं आढळतात. या मुलांच्या शरीरात कोव्हिडसाठीच्या अँटीबॉडीज असतात आणि त्यांच्या शरीरातली रोग प्रतिकारक शक्ती हा जास्त कार्यरत झाल्यानं ही परिस्थिती उद्भवते.

कुठली लक्षणं दिसतात?

मुलांमध्ये आढळणाऱ्या कावासाकी सिंड्रोमसारखीच ही लक्षणं असतात. हृदय, फुफ्फुसं, किडनी, मेंदू, डोळे, त्वचा, पोटातील आतडी या अवयवांवर याचा परिणाम होऊ शकतो.

  • मुलांच्या शरीरातल्या महत्त्वाच्या अवयवयांचा दाह (Inflamation)
  • पोट बिघडणं
  • पोटात दुखणं
  • उलट्या
  • अंगावर पुरळ उमटणं
  • डोळे लाल होणं
  • ताप येणं
  • मानदुखी
  • हात-पाय सुजणे
  • श्वास घेण्यास त्रास 
  • जीभ-घसा लाल होणं

काय काळजी घ्यावी?

  • मुलांमध्ये ही लक्षणं आढळल्यास त्यांना पूर्वी कोव्हिड होऊन गेला होता का? याविषयी डॉक्टरांना सांगणं आवश्यक आहे.
  • या आजारावर लवकर उपचार होऊ आवश्यक आहे. नाहीतर हृदयक्रिया बंद पडणे किंवा इतर गंभीर आजारा उद्भवू शकतात.
  • कोविड होऊन गेला असेल तर पालकांनी निर्धास्त होऊ नये. कोविड बरा झाल्यानंतर देखील शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
  • घरातील कोणी कोव्हिड पॉझिटिव्ह होतं का? आणि परिणामी या काळात मूलही एसिम्प्टमॅटिक असण्याची शक्यता आहे का? हे देखील लक्षात ठेवावं.
  • मुलांमध्ये आढळणाऱ्या लक्षणांचा संबंध इतर कोणत्याही विकाराशी लागत नसल्यास मुलांना कोव्हिड होऊन गेला होता का? याची तपासणी अँटीबॉडी टेस्टद्वारे केली जाऊ शकते.



हेही वाचा

रूग्णसंख्येनुसार बेड वाढलेच पाहिजेत, आरोग्यमंत्र्यांची प्रशासनाला सक्त ताकीद

राज्य सरकारला धक्का, रेमडेसिवीरचा पुरवठा करण्यास कंपन्यांचा नकार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा