Advertisement

राज्य सरकारला धक्का, रेमडेसिवीरचा पुरवठा करण्यास कंपन्यांचा नकार

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. बेड, आॅक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे राज्य सरकारने रेमडेसीवीर इंजेक्शन खरेदीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

राज्य सरकारला धक्का, रेमडेसिवीरचा पुरवठा करण्यास कंपन्यांचा नकार
SHARES

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. बेड, आॅक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे राज्य सरकारने रेमडेसीवीर इंजेक्शन खरेदीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. इंजेक्शनचा पुरवठा करण्यास कोणताही पुरवठादार तयार नाही. पुरवठादारांनी रेमडेसीवीर इंजेक्शन देण्यास नकार दिला आहे.

राज्य सरकारने ८.५० लाख रेमडेसीवीर खरेदीचं टेंडर काढलं आहे. पण पुरवठादारांनी इंजेक्शन देण्यास नकार दिला आहे. राज्य सरकारला ६५४ रुपये दराने रेमडेसीवीर इंजेक्शन हवे आहे. पण खुल्या बाजारात बाराशे रुपये किंमत असताना कंपनी  सरकारला रेमडेसिवीर देण्यास तयार नाहीत. १२०० रुपयांना इंजेक्शन घ्या. कच्च्या मालाचे भाव वाढले आहे. त्यामुळे कमी दरात रेमडेसिवीर देणं शक्य नाही, असं कंपन्यांनी सांगितलं आहे. 

बाजारात आम्ही १२०० रुपयांना विकतो तर सरकारला कमी दरात कसे देणार. आता उत्पादन कमी आहे त्यामुळे ६६० रुपये दराने रेमडेसिवीर दिले. त्यावेळी कंपनीकडे साठा पडून होता, असंही या कंपन्यांचं म्हणणं आहे.

केंद्र सरकारनं रेमडेसिवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.  त्यामुळे राज्य सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शन उत्पादक सात कंपन्यांकडून निविदा पद्धतीनं खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कंपन्यांना देशांतर्गत विक्रीस मुभा मिळाली आहे. त्यामुळे या कंपन्या टेंडरमध्ये सहभागी होऊ शकला नाहीत. त्यामुळे टेंडरला पुन्हा ३ दिवस मुदतवाढ द्यावी लागली आहे. रेमडेसिवीरचा पुरवठा आणखी लांबणीवर पडणार आहे.



हेही वाचा -

नागरिकांनी गर्दी केल्यास अत्यावश्यक सेवाही बंद करा- मुख्यमंत्री

केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवास

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा