Advertisement

केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवास

मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची माहिती आहे.

केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवास
SHARES
  • राज्य सरकारनं लागू केलेल्या नवीन निर्बंधानुसार केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलनं प्रवास करता येणार आहे. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांच्या लोकल प्रवासावर बंधनं आली आहेत.
  • सध्या राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्यानं सरकारनं कडक निर्बंध लागू केले आहेत.
  • योग्य कारणाशिवाय नागरिकांना घराबाहेर पडण्यावर बंधन घालण्यात आले आहे.
  • अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवासाची मुभा दिली गेली आहे.
  • वैद्यकीय सेवेतील कर्मचारी, पोलीस दलातील कर्मचारी, सरकारी कार्यालयातील कर्मचारी, बँक, वित्त आणि विमा सेवा कर्मचारी आदींना लोकलमधून प्रवास करता येईल.
  • स्थानकाच्या प्रवेशद्वारावर रेल्वे पोलीस आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
  • राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ज्या संवर्गातील नागरिकांना प्रवासास मुभा दिली आहे, त्यांनाच स्थानकात प्रवेश दिला जाईल.
  • नागरिकांचे अधिकृत ओळखपत्र तपासले जाईल.
  • अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त विनाकारण फिरणाऱ्यांना प्रवासास परवानगी दिली जाणार नाही.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा