Advertisement

रूग्णसंख्येनुसार बेड वाढलेच पाहिजेत, आरोग्यमंत्र्यांची प्रशासनाला सक्त ताकीद

जिल्ह्यातील रूग्णसंख्येच्या वाढत्या गतीनुसार बेड्स देखील वाढलेच पाहिजे. बेड्स नाही हे उत्तर मी कदापी सहन करणार नाही, अशी सक्त ताकीद आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनाला दिली आहे.

रूग्णसंख्येनुसार बेड वाढलेच पाहिजेत, आरोग्यमंत्र्यांची प्रशासनाला सक्त ताकीद
SHARES

जिल्ह्यातील रूग्णसंख्येच्या वाढत्या गतीनुसार बेड्स देखील वाढलेच पाहिजे. बेड्स नाही हे उत्तर मी कदापी सहन करणार नाही. प्रत्येक ठिकाणी वैद्यकीय सुविधा किंवा आरोग्य सुविधा वाढवल्या गेल्या पाहिजे, अशी सक्त ताकीद आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी प्रशासनाला दिली आहे. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेत, प्रशासनाला कडक सूचना केल्या आहेत. या बैठकीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांना सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना बेड मॅनेजमेंट खूप गरजेचं आहे. राज्यभरातून बेड्स उपलब्ध नसल्याच्या तक्रारी येत आहे. या तक्रारी दूर करण्यासाठी जिल्ह्यातील रुग्णसंख्येच्या ग्रोथ रेटनुसार बेड्सची संख्या देखील वाढलीच पाहिजे. बेड्स नाही हे उत्तर मी कदापी सहन करणार नाही, असे निर्देश प्रशासनाला दिल्याचं त्यांनी सांगितलं. 

प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य सुविधा वाढवल्या गेल्या पाहिजे. आॅक्सिजनची सुविधा असलेल्या बेड्सची संख्याही वाढली पाहिजे. रूग्णालयात जागा नसेल तर एखाद्या संस्थेत बेड्सची व्यवस्था करावी, खासगी रूग्णालयातील ८० टक्के बेड्स ताब्यात घेतलेच पाहिजे, असा इशारा प्रशासनाला दिल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. 

हेही वाचा- किराणा, भाजीपाला, लोकलवर आणखी कडक निर्बंध येणार!

ऑक्सिजनचं व्यवस्थापन करताना त्याचा अपव्यय किंवा अतिरिक्त वापर होणार नाही याकडे लक्ष देण्याचं, वातावरणातील ऑक्सिजन शोषून घेत रुग्णाला पुरवठा करणाऱ्या मशिनचा जास्तीत जास्त वापर करावा, कॉण्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावं, कोरोना निदानासाठी आरटीपीसीआर चाचण्यांवर भर द्यावा. ॲन्टीजेन चाचण्यांचं प्रमाण कमी करून दोन्ही चाचण्यां अनुक्रमे ७०:३० या प्रमाणात कराव्यात.

आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट २४ तासात मिळावात यासाठी प्रयत्न करावा, प्रत्येक जिल्ह्यात डॅश बोर्ड आणि हेल्पलाईनची सुविधा झाली पाहिजे. बाधित रुग्णांची ने-आण करण्यासाठी खासगी वाहने भाड्याने घ्यावीत त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मदत घ्यावी, असे निर्देश राजेश टोपे यांनी दिले आहेत. 

काही  जिल्ह्यांचा मृत्यूदर वाढतोय त्याचं कारण शोधा. रुग्ण उपचारासाठी उशीरा दाखल होत असून त्यांनी वेळेवर दाखल व्हावं यासाठी जनजागृती करण्यात यावी, जेणेकरून लक्षणं दिसताच रुग्ण वेळेवर रुग्णालयात येतील. त्यासाठी ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांच्या क्षेत्रातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक घ्यावी आणि लक्षणं असलेल्या रुग्णांची तातडीने चाचणी करतानाच अनावश्यक उपचार न करण्याबाबत सूचना देण्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. बऱ्याच ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण होम आयसोलेशन गांभीर्याने पाळत नाही असे निदर्शनास येत आहे त्यामुळे त्यांचे संस्थात्मक अलगीकरण करावं, अशी सूचना आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केली.

(maharashtra health minister rajesh tope clarifies on bed management in covid 19 pandemic)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा