Advertisement

कोविड रुग्णांना दिला जाणारा ऑक्सिजन कसा आणि कुठे बनतो? जाणून घ्या

हवेत उपलब्ध असणारा ऑक्सिजन रुग्णालयांसाठी कसा तयार केला जातो हे जाणून घ्या.

कोविड रुग्णांना दिला जाणारा ऑक्सिजन कसा आणि कुठे बनतो? जाणून घ्या
SHARES

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे आरोग्यसेवा देखील अपुरी पडत आहे. कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन देखील आता कमी पडू लगला आहे. अनेक रुग्णालयांमधील ऑक्सिजन सेवा विस्कळीत झाली आहे.


ऑक्सिजनचा तुटवडा

कोव्हिडची साथ बघता राज्यातला १०० टक्के ऑक्सिजन आरोग्य सुविधांसाठी राखीव ठेवण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. सध्या दिवसाला ९५० ते १००० टन ऑक्सिजन राज्यात वापरला जात असल्याचीही माहिती त्यांनी दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्मिती होत असूनही आतापासूनच राज्यात काही ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला आहे.

महाराष्ट्रात मुंबईजवळचं तळोजा, पुणे आणि नागपूर अशा मोजक्याच ठिकाणी द्रवरुपातील ऑक्सिजन तयार केला जातो. पण तिथून तो इतर शहरांमध्ये पोहोचवण्यास वेळ लागतो.

अशी होते ऑक्सिजनची निर्मिती

  • फॅक्टरीत हवेतला ऑक्सिजन वेगळा केला जातो. त्याठिकाणी हवा उच्च दाबाखाली शुद्ध करून भरली जाते आणि थंड केली जाते. मग इतर वायूंपासून ऑक्सिजन विलग केला जातो. मग हा ऑक्सिजन द्रव स्वरुपात साठवला जातो. पुढे मोठ्या टँकरने तो हॉस्पिटलला पाठवला जातो. हॉस्पिटलमध्ये तो क्रोयोजनिक सिलिंडरमध्ये साठवला जातो. तिथून पाईपद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला जातो.
  • काही हॉस्पिटलमध्ये ही सुविधा उपलब्ध नसते. तेव्हा त्या ठिकाणी गॅस सिलिंडरद्वारे पुरवठा केला जातो.
  • तर काही हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मदत घेतली जाते. हे मशीन हवेतून ऑक्सिजन शुद्ध करून रुग्णांना पुरवतं आणि ते वापरणं तुलनेनं सोपं असतं. पण ते वापरणं काहीप्रमाणात धोकादायक ठरू शकतं, असं तज्ञांचं म्हणणं आहे.



हेही वाचा

लहान मुलांमध्ये वाढतोय मल्टीसिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोम, जाणून घ्या 'या' आजाराबद्दल

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा