Advertisement

बेशिस्त रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई

भाड्यास नकार देणाऱ्या चालकांचा परवाना रद्द करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

बेशिस्त रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई
SHARES

नियमभंग तसेच भाडे नाकारणाऱ्या टॅक्सी व रिक्षाचालकांना वाहतूक पोलिसांनी वठणीवर आणले आहे. भाड्यास नकार देणाऱ्या 28,814 चालकांचा परवाना (permit) रद्द करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

तसेच दोन आठवड्यांत घेतलेल्या विशेष मोहिमेत 48,417 बेशिस्त रिक्षा, टॅक्सीचालकांवरही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांत प्रवाशांकडून मुंबईतील (mumbai) रिक्षा-टॅक्सीचालकांविरोधात (taxi) अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सर्वाधिक तक्रारी भाडे नाकारण्याबाबत होत्या. या तक्रारींची दखल घेत वाहतूक पोलिसांनी 18 एप्रिल ते 2 मे या कालावधीत विशेष मोहीम हाती घेतली.

यावेळी नियमभंग करणाऱ्या 48,417 बेशिस्त रिक्षा-टॅक्सी (rickshaw) चालकांना सुमारे 40 लाख रुपये दंडाचे ई-चलान बजावण्यात आले.

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण कारवायांमध्ये भाडे नाकारणाऱ्या 28814, विनागणवेश 1164, मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणाऱ्या 6268 तर अन्य नियमभंग करणाऱ्या 12171 रिक्षा-टॅक्सीचालकांवर कारवाई करण्यात आली.

भाडे नाकारल्यास कारवाईचा इशारा देऊनही रिक्षा आणि टॅक्सीचालकांची मुजोरी कायम असल्याने त्यांचे परवाने जप्त करून ते रद्द करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविण्यात आल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.



हेही वाचा

वांद्रे वरळी सी लिंक 45 मिनिटांचा प्रवास 10 मिनिटांत

1500 रुपयांचे 2100 होणार नाही; लाडक्या बहिणींचा अपेक्षाभंग

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा