राज्यात कोरोनाची रुग्णांची संख्या मुंबईत आहे. मुंबईतील रुग्णांची संख्या रोज वाढतच आहे. मात्र, अशा परिस्थितीत एक दिलासादायक बाब आहे. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आता घटला आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग 7 वरून 13 दिवसांवर आला आहे.
मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या दुपटीचा वेग एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात 7 दिवसांचा होता. त्यानंतर हा वेग 10 दिवसांवर आला. 1 मे रोजी मुंबईत 7625 रुग्ण होते, तर 13 मे रोजी रुग्णसंख्या 15 हजार 581 वर पोहचली होती. रुग्णसंख्या दुपटीचा वेग मंदावला असून 7 दिवसांवरून 13 दिवसांवर आला असल्याचं पालिकेत विशेष नियुक्ती केलेल्या मनीषा म्हैसकर यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे.
टाळेबंदी, रुग्णांच्या संपर्कात आलेल्याचा तातडीने शोध आणि निदान यामुळे रुग्णवाढीचा वेग कमी करणे शक्य झालं आहे. नायर रुग्णालयाने कमी वेळेत ७५० खाटा करोनाबाधित रुग्णांसाठी सुरू करून आव्हान पेलले आहे. यात ११० खाटा करोनाबाधित माता, ५० डायलिसीसवरील रुग्ण, ५३ अतिदक्षता विभागात उपलब्ध असून ९६ खाटा संशयित आणि लक्षणे असलेल्या करोनाबाधित रुग्णांसाठी आहेत. मे अखेर खाटांची क्षमता एक हजारापर्यंत वाढविण्यात येणार आहे. नायरमध्ये चाळीसहून अधिक मातांची प्रसूती झाली असून यातील एकाही बाळाला संसर्ग झालेला नाही, याचा विशेष उल्लेख मैसकर यांनी केला आहे.
उपचाराची गरज असलेल्या प्रत्येक रुग्णाला खाट उपलब्ध होण्यासाठी खाटांची क्षमता वाढविण्यावर पालिकेचा सध्या भर आहे. १५ एप्रिलपर्यत शासकीय रुग्णालयांमध्ये १६०० खाटा उपलब्ध होत्या. १ मेपर्यत खाटांची संख्या २९०० पर्यत वाढविली. १५ मे पर्यत ही संख्या ३५४० वर पोहचली आहे.
लाॅकडाऊनचा चौथा टप्पा कसा? मुख्यमंत्र्यांची शरद पवारांशी चर्चा
मुंबईत ३१ मेपर्यंत कोरोनाग्रस्तांसाठी आणखी ३१०० बेड्स