Advertisement

मुंबईत ३१ मेपर्यंत कोरोनाग्रस्तांसाठी आणखी ३१०० बेड्स

मुंबईतल्या खासगी रुग्णालयांनी कोरोनाबाधितांवर (corona patient) उपचार करण्यासाठी सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या बेडच्या संख्येत दुपटीने वाढ केली पाहिजे, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी दिले आहेत.

मुंबईत ३१ मेपर्यंत कोरोनाग्रस्तांसाठी आणखी ३१०० बेड्स
SHARES

मुंबईतल्या खासगी रुग्णालयांनी कोरोनाबाधितांवर (corona patient) उपचार करण्यासाठी सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या बेडच्या संख्येत दुपटीने वाढ केली पाहिजे, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी दिले आहेत. व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी शहरात उपलब्ध बेडचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता आणि सार्वजनिक आरोग्य सचिव प्रदीप व्यास हे देखील उपस्थित होते.

सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी आवश्यक बेडची (hospital beds) संख्या कमी असल्याने कोरोनाबाधित रुग्ण आणि कोरोना संशयित असे दोघेही रुग्णालयांत जाण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं निदर्शनास आलं आहे. यामुळे दोन्ही प्रकारच्या रुग्णालयात बेड्सची संख्या वाढवणं गरजेचं असल्याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं. 

हेही वाचा - मुंबईला कोरोनामुक्त कधी करणार? आशिष शेलारांचा शिवसेनेला सवाल

कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये (private hospital) पुरेशी सुविधाच उपलब्ध होत नाही. बहुसंख्य खासगी रुग्णालये कोरोनाबाधितांवर उपचार करण्यास तयार नाहीत, अशा तक्रारी देखील रुग्णांकडून मिळत आहेत. खासगी रुग्णालयातील डाॅक्टर, नर्स, वाॅर्ड बाॅय, इतर वैद्यकीय अधिकारी यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा प्रमाण वाढल्यानंतर खासगी रुग्णालयांनी आपलं पाऊल मागे घेतलं. 

कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी महापालिका (bmc hospital) रुग्णालये एकूण उपलब्ध ३,६०० बेड्सच्या तुलनेत ८० टक्के क्षमता वापरात आणत आहेत. तर यातुलनेत खासगी रुग्णालयातील केवळ ११०० बेड्स कोरोनाबाधितांसाठी वापरले जात आहेत. याकडे पाहता ३१ मे पर्यंत सार्वजनिक रुग्णालयांत आणखी २१०० बेड्स, तर खासगी रुग्णालयांत आणखी १२०० बेड्स कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न असणार आहे. त्याशिवाय प्रत्येक दिवशी रुग्णालयातील १ किंवा २ वाॅर्ड कोरोनाग्रस्तांसाठी उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयतन केला जाणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

सद्यस्थितीत गंभीर कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्याठी सरकारी आणि खासगी रुग्णालयांत मिळून केवळ ४८०० हून अधिक बेड्स उपलब्ध आहेत. परंतु शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने या रुग्णालयांवर भार पडत आहे. यामुळे महापालिका रुग्णालयांत बेड्सची संख्या ५७०० आणि खासगी रुग्णालयात २३०० वर बेड्सची संख्या नेण्याचा प्रयत्न केला जात आहे.   

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा