Advertisement

नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ९७४ वर, गुरूवारी वाढले 64 रुग्ण

नवी मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे या ठिकाणी चिंतेंचं वातावरण आहे.

नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ९७४ वर, गुरूवारी वाढले 64 रुग्ण
SHARES

नवी मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे या ठिकाणी चिंतेंचं वातावरण आहे. वाढती संख्या नियंत्रणात आणणे महापालिका प्रशासनासाठी आव्हानात्मक बाब ठरली आहे. गुरुवारी नवी मुंबईत कोरोनाचे आणखी ६४ रुग्ण आढळून आहेत. कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता ९७४ वर पोहोचली आहे. 

 १०५६ नागरिकांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. दीड महिन्यात नवी मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा एक हजारच्या घरात गेला आहे. परंतु मृत्यूदर दोन टक्क्यांवर स्थिरावला असल्यामुळे तेवढीच एक जमेची बाजू ठरली आहे. शिवाय २५५ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी गेले. नवी मुंबईत गुरुवारी आढळून आलेल्या ६४ रुग्णांमध्ये बेलापूरमधील ५, नेरूळमधील १३, वाशीतील ५, तुर्भेतील ५, कोपरखैरणेतील १२, घणसोलीतील ५, ऐरोली येथील १२, दिघा येथील ७ रुग्णांचा समावेश आहे. 

नवी मुंबईतील कोरोना रुग्णांपैकी 40 टक्के रुग्ण एपीएमसी संबंधित असल्याने सध्या बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत मार्केटमध्ये 117 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. 55 रुग्ण एपीएमसीमध्ये काम करणारे आहेत. त्यात व्यापारी, कर्मचारी आणि मजुरांचा समावेश आहे. तर 62 जण एपीएमसी मार्केटशी संबंधित आहेत.


हेही वाचा -

महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लाॅकडाऊन? पण केंद्रानंतरच घोषणेची शक्यता

पोलिसांवर हल्ल्याच्या 218 गुन्हे, तर 770 जणांना अटक



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा