Advertisement

मुंबईला कोरोनामुक्त कधी करणार? आशिष शेलारांचा शिवसेनेला सवाल

मुंबईला कोरोनामुक्त कधी करणार असा सवाल भाजपचे नेते आमदार आशिष शेलार (bjp mla ashish shelar) यांनी केला आहे.

मुंबईला कोरोनामुक्त कधी करणार? आशिष शेलारांचा शिवसेनेला सवाल
SHARES

मुंबईसाठी वेगळ्या आर्थिक पॅकेजची (stimulus package for mumbai) मागणी करणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत (shiv sena mp sanjay raut) यांना उद्देशून मुंबईला कोरोनामुक्त कधी करणार असा सवाल भाजपचे नेते आमदार आशिष शेलार (bjp mla ashish shelar) यांनी केला आहे. केंद्र सरकार शक्य ते करुन दाखवत आहेच...आता तुम्ही काहीतरी करुन दाखवा ना! असं म्हणत त्यांनी महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेला तसंच राज्यातील महाविकास आघाडीला (maha vikas aghadi) देखील आव्हान दिलं आहे.

फायदा मुंबईलाच

मुंबईसाठी वेगळं आर्थिक पॅकेज या मुद्द्यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले, देशासाठी पॅकेज जाहीर झाल्यावर त्यातून मुंबईला कसं वेगळं काढणार? सर्वाधिक उद्योग आणि करदाते मुंबईत असल्याने पॅकेजचा सर्वाधिक फायदा मुंबईलाच होईल! तरीसुद्धा पत्रपंडित म्हणतात की मुंबईसाठी वेगळे पॅकेज द्या? हे म्हणजे रोज सकाळी उचलली जीभ लावली टाळ्याला!

 हेही वाचा - मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची हीच ती वेळ- जितेंद्र आव्हाड

मुंबईला कोरोनामुक्त (coronavirus) कधी करणार ? हे सांगा, मुंबईला पूर्वपदावर कधी आणणार? हे सांगा, मुंबईकरांना मृत्यूच्या दाढेतून कधी वाचवणार? हे सांगा, मुंबई पुरामुळे तुंबणार नाही, 

याची हमी द्या!! केंद्र सरकार शक्य ते करुन दाखवत आहेतच...आता तुम्ही काहीतरी करुन दाखवा ना! असे अनेक प्रश्न देखील शेलार यांनी उपस्थित केले आहेत.

परप्रांतीय गावी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केल्यानंतर संजय राऊत यांनी मुंबईकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. लाॅकडाऊनमुळे (lockdown) मुंबईतील उद्योगधंदे ठप्प झाल्याने हातावर पोट असलेल्या परप्रांतीय मजुरांच्या (migrant workers) उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्याच्या स्थितीत मुंबईसारख्या महानगरातही पोट भरण्याची, भविष्याची चिंता सतावू लागल्याने शहर परिसरातील लाखो मजूर मुंबईतून स्थलांतर करून आपापल्या गावी निघून गेले आहेत. 

मुंबईतून महसूल

देशाच्या तिजोरीत जमा होणाऱ्या एकूण महसुलापैकी २० ते २५ टक्के महसूल एकट्या मुंबईतून जमा केला जातो. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने या शहराचं महत्त्व टिकवून ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी मुंबई तसंच मुंबईसारख्या देशातील इतर शहरांसाठी देखील वेगळं आर्थिक पॅकेज दिलं पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती. 

 हेही वाचा - मुंबईसाठी वेगळं आर्थिक पॅकेज द्या- संजय राऊत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा