Advertisement

मुंबईसाठी वेगळं आर्थिक पॅकेज द्या- संजय राऊत

मुंबईसाठी वेगळं आर्थिक पॅकेज देण्याची मागणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत (shivsena mp sanjay raut) यांनी केली.

मुंबईसाठी वेगळं आर्थिक पॅकेज द्या- संजय राऊत
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजचं (stimulus package for india) स्वागत करताना मुंबईसाठी वेगळं आर्थिक पॅकेज देण्याची मागणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत (shivsena mp sanjay raut) यांनी केली. 

टीका योग्य नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजवर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान मोदींनी या आर्थिक पॅकेजच्या माध्यमातून देशातील शेतकरी, मजूर, लघू-मध्यम उद्योगांना (business) दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाचं (coronavirus) मोठं संकट असल्यानं सध्याच्या स्थितीत त्यांच्यावर राजकीय टीका करणं योग्य नाही. संपूर्ण देशाने पंतप्रधानांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. या पॅकेजसोबत केंद्र सरकारने मुंबई आणि मुंबईसारख्या इतर शहरांसाठीही वेगळं पॅकेज (stimulus package for mumbai) देणं गरजेचं आहे. 

हेही वाचा - देवस्थानाचं सोनं ताबडतोब ताब्यात घ्या, पृथ्वीराज चव्हाणांची केंद्राला सूचना

परप्रांतीयांचा प्रश्न

लाॅकडाऊनमुळे (lockdown) मुंबईतील उद्योगधंदे ठप्प झाल्याने हातावर पोट असलेल्या परप्रांतीय मजुरांच्या (migrant workers) उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्याच्या स्थितीत मुंबईसारख्या महानगरातही पोट भरण्याची, भविष्याची चिंता सतावू लागल्याने शहर परिसरातील लाखो मजूर मुंबईतून स्थलांतर करून आपापल्या गावी निघून गेले आहेत. 

मुंबईतून महसूल

देशाच्या तिजोरीत जमा होणाऱ्या एकूण महसुलापैकी २० ते २५ टक्के महसूल एकट्या मुंबईतून जमा केला जातो. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने या शहराचं महत्त्व टिकवून ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी मुंबई तसंच मुंबईसारख्या देशातील इतर शहरांसाठी देखील वेगळं आर्थिक पॅकेज दिलं पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा