Advertisement

लाॅकडाऊनचा चौथा टप्पा १८ मे पासून, देशाला २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज - पंतप्रधान

देशावर ओढावलेलं कोरोनाचे संकट (coronavirus) आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारतासाठी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची (economic package) घोषणा केली.

लाॅकडाऊनचा चौथा टप्पा १८ मे  पासून, देशाला २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज - पंतप्रधान
SHARES

देशावर ओढावलेलं कोरोनाचे संकट (coronavirus) आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारतासाठी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची (economic package) घोषणा केली. हे पॅकेज जीडीपीच्या १० टक्के असल्याचं त्यांनी सांगितलं. सोबतच देशव्यापी लाॅकडाॅऊनचा (Lockdown) चौथा टप्पा १८ मे पासून सुरू होणार असल्याची मोठी घोषणा देखील पंतप्रधान मोदी यांनी केली. 

लाॅकडाऊन ४.०

कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी (pm narendra modi) आपल्या भाषणात लाॅकडाऊन संपण्याची घोषणा करणार की लाॅकडाऊन पुढं वाढवणार? याकडे तमाम देशवासीयांचं लक्ष लागून राहीलं होतं. यावेळी त्यांनी लॉकडाऊन १८ मे पासून पुढे वाढवणार असल्याची घोषणा केली. पण या लाॅकडाऊनमधील अटी आणि शर्थी वेगळ्या असतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

हेही वाचा- थकलेला जीएसटी लवकर द्या, मुख्यमंत्र्यांनी पुन्हा करून दिली पंतप्रधानांना आठवण

स्वावलंबी भारतासाठी

याचसोबत मोदी यांनी स्वावलंबी भारत मोहिमेअंतर्गत विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली. गेल्या काळात दिलेल्या पॅकेजशी हे पॅकेज जोडल्यावर भारताच्या जीडीपीच्या १० टक्के म्हणजेच जवळपास २० लाख कोटी रुपयांचं हे पॅकेजे आहे, असं ते म्हणाले. देशासाठी दिवसरात्र झटणारे शेतकरी, लघू, मध्यम उद्योग, मजुरांसाठी तसंच प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी पॅकेज आहे, असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. 

भारतासाठी मोठी संधी

एका व्हायरसने जगाला उद्धवस्त केलं आहे. जगातील कोट्यवधी लोकं कोरोना संकटाचा सामना करत आहेत. हे संकट कल्पनेपलिकडचं आहे. कोरोना संकटाच्या आधीचं जग आपण पाहिलं आणि नंतरचं जगंही आपल्याला पाहायचं आहे. गेल्या शतकापासून २१ वं शतक भारताचं असल्याचं आपण ऐकत आहोत. २१ वं शतक भारताचं व्हावं, हे आपलं स्वप्न नाही तर जबाबदारीही आहे. जगाची आजची स्थिती पाहता आत्मनिर्भर भारत हाच एकमेव मार्ग आहे, असं मोदी म्हणाले.

जेव्हा कोरोना संकट सुरु झालं तेव्हा भारतात एकही पीपीई किट बनत नव्हतं. एन-९५ मास्कचे नाममात्रच उत्पादन होत होतं. पण भारतात रोज २ लाख पीपीई आणि मास्क बनवण्यात येत आहेत. संकटाला संधीमध्ये बदलण्याची ही वेळ असल्याचा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा