Advertisement

मुंबई लोकल सुरू करु द्या, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती

अत्यावश्यक सेवतील कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी मुंबई उपनगरीय रेल्वे (mumbai local train) सेवा सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

मुंबई लोकल सुरू करु द्या, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती
SHARES

मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा (public transport) कणा असलेली लोकल ट्रेन लाॅकडाऊन लागू झाल्यापासून पूर्णपणे बंद आहे. मात्र लाॅकडाऊनचा (lockdown) तिसरा टप्पा संपत आलेला असताना अत्यावश्यक सेवतील कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी मुंबई उपनगरीय रेल्वे (mumbai local train) सेवा सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांना केली. सोमवार ११ मे रोजी पंतप्रधानांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही विनंती केली.

हेही वाचा - १२ मेपासून पॅसेंजर ट्रेन धावणार

अतिरिक्त बस सेवा

लाॅकडाऊन सुरू झाल्यापासून रेड झोनमध्ये येणाऱ्या मुंबईत (red zone mumbai) अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोईसाठी एसटी आणि बेस्ट बसची (best bus and msrtc bus) सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मुंबई शहर, उपनगर, वसई-विरार, पालघर, नवी मुंबई, ठाणे-कल्याण इत्यादी परिसरातून मोठ्या संख्येने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी या बस सेवेचा वापर करून मुंबईत ये-जा करत आहेत. तरीही काही वेळेस बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं कठिण जात आहे. शिवाय या बस ठराविक वेळेतच सुटत असल्याने मधल्या वेळेत प्रवाशांना स्टाॅपवर तिष्ठत उभं राहावं लागत आहे. 

ओळखपत्र पाहून

अशी सर्व परिस्थिती असताना तसंच देशात पॅसेंजर ट्रेनची सुविधा उपलब्ध करून दिली जात असताना मुख्यमंत्र्यांनी उपनगरीय रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या काॅन्फरन्सिंगमध्ये बोलताना ते म्हणाले की, मुंबई मध्येही उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करावी. मात्र फक्त अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठीच ती असावी व केवळ ओळखपत्र पाहून प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.

लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करताना आपण ग्रीन झोन्समध्ये उद्योग-व्यवसाय सुरु होतील असं पाहिलं आहे. परप्रांतीय मजुरांची वाहतूक सुरु झाली आहे. मात्र हे करताना प्रत्येक राज्याने व्यवस्थित काळजी आवश्यक आहे. अन्यथा कोरोना संसर्ग देशभर वाढू शकतो, असंही मुख्यमंत्री म्हणाले. 

हेही वाचा - उद्धव ठाकरेंनी भरला उमेदवारी अर्ज, मुख्यमंत्रीपदावरची टांगती तलवार दूर

पॅसेंजर ट्रेन

दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेनं केलेल्या ट्विटनुसार भारतीय रेल्वे १२ मे पासून पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याचा विचार करीत आहे. यानुसार टप्प्याटप्प्यानं रेल्वे सुरू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राथमिक पातळीवर ३० रिटर्न ट्रेन सुरू होतील. या विशेष ट्रेन म्हणून चालवल्या जातील. नवी दिल्ली, दिलबर्गा, आगरताळा, हावडा, पटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, तिरुअनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद, जम्मू या प्रमुख स्थानकांपर्यंत रेल्वे जाणार आहेत.
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा