Advertisement

उद्धव ठाकरेंनी भरला उमेदवारी अर्ज, मुख्यमंत्रीपदावरची टांगती तलवार दूर

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) तसंच शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे (neelam gorhe) यांनी सोमवारी दुपारी विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज (vidhan parishad election nomination form) भरला.

उद्धव ठाकरेंनी भरला उमेदवारी अर्ज, मुख्यमंत्रीपदावरची टांगती तलवार दूर
SHARES

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray)  तसंच शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे (neelam gorhe) यांनी सोमवारी दुपारी विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज (vidhan parishad election nomination form) भरला. ९ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी केवळ ९ जणांनीच अर्ज भरल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याचं जवळपास निश्चित आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरील टांगती तलवार देखील यामुळे दूर झाली आहे.  

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी मतदान होत आहे. विधान परिषदेत रिक्त झालेल्या ९ जागांपैकी भाजपच्या ३, राष्ट्रवादी ३, काँग्रेस २ आणि शिवसेना १ अशा जागेचा समावेश आहे. विधानसभेत निवडून आलेले २८८ आमदार या ९ जागांसाठी मतदान करतील. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ११ मे अशी आहे. २४ एप्रिल रोजी होणारी ही निवडणूक कोरोना संकटामुळे पुढं ढकलण्यात आली होती.

हेही वाचा - काॅंग्रेस, राष्ट्रवादीचे प्रत्येकी २ उमेदवार, शिवसेना नाराज?

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी सर्वात पहिल्यांदा शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे असे आपले दोन्ही उमेदवार घोषित केले होते. त्यानंतर भाजपने (bjp candidates) प्रवीण दटके, डॉ. अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते-पाटील आणि गोपीचंद पडळकर असे ४ उमेदवार निवडणुकीत उतरवले. पाठोपाठ काँग्रेसने (congress candidates) राजेश राठोड यांच्या उमेदवारीची घोषणा करतानाच या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून आणखी एक उमेदवार उभा करण्यात येईल, अशी भूमिका घेतल्याने पेच निर्माण झाला. तर राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp candidates) शशिकांत सावंत आणि अमोल मिटकरी यांना उमेदवारी दिली.

काँग्रेसने २ उमेदवार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असते, तर ९ जागांसाठी १० उमेदवार अशी स्थिती निर्माण झाली असती. अशा वेळी भाजपकडून काटशहाचं राजकारण होण्याची भीती होती. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नसेल, तर निवडणूकच लढवणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेत काँग्रेसवर दबाव टाकला. अखेर काँग्रेसने झुकतं माप घेत, दुसरा उमेदवार रिंगणात उभा न करण्याचं ठरवलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा