Advertisement

मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची हीच ती वेळ- जितेंद्र आव्हाड

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसाठी (stimulus packege for mumbai) वेगळं पॅकेज देण्याची मागणी करणाऱ्यांमध्ये राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Housing minister jitendra awhad) यांची देखील भर पडली आहे.

मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची हीच ती वेळ- जितेंद्र आव्हाड
SHARES

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसाठी (stimulus packege for mumbai) वेगळं पॅकेज देण्याची मागणी करणाऱ्यांमध्ये राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Housing minister jitendra awhad) यांची देखील भर पडली आहे. भारताच्या जडणघडणीत मुंबईचा मोठा वाटा आहे. त्यामुळे कोरोना (coronavirus) संकटाच्या काळात मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची हीच ती वेळ असल्याचं म्हणत आव्हाड यांनी मुंबईसाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. याआधी हीच मागणी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (shivsena mp sanjay raut) यांनी देखील केली होती.

पंतप्रधानांची घोषणा

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. स्वावलंबी भारत मोहिमेअंतर्गत भारताच्या जीडीपीच्या १० टक्के म्हणजेच जवळपास २० लाख कोटी रुपयांचं हे आर्थिक पॅकेज आहे. देशासाठी दिवसरात्र झटणारे शेतकरी, लघू, मध्यम उद्योग, मजुरांसाठी तसंच प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी हे पॅकेज आहे, असं मोदी म्हणाले होते.

हेही वाचा मुंबईसाठी वेगळं आर्थिक पॅकेज द्या- संजय राऊत

उभारी देण्याची गरज

त्यासंदर्भात आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भाष्य करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, भारताच्या जडणघडणीत मुंबईचा मोठा वाटा आहे ,देशात कररूपाने सर्वात जास्त पैसा हा मुंबईतून जमा होत होता. पण आता मुंबईला नव्याने उभारी देण्याची गरज आहे. मुंबईतील उद्योग, आरोग्य, कामगार क्षेत्रासाठी एका स्वतंत्र आणि मोठ्या पॅकेजची आवश्यकता आहे. मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची हीच ती वेळ आहे. 

परप्रांतीय गावाला

याआधी संजय राऊत यांनी देखील हीच मागणी केली होती. लाॅकडाऊनमुळे (lockdown) मुंबईतील उद्योगधंदे ठप्प झाल्याने हातावर पोट असलेल्या परप्रांतीय मजुरांच्या (migrant workers) उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्याच्या स्थितीत मुंबईसारख्या महानगरातही पोट भरण्याची, भविष्याची चिंता सतावू लागल्याने शहर परिसरातील लाखो मजूर मुंबईतून स्थलांतर करून आपापल्या गावी निघून गेले आहेत. 

मुंबईतून महसूल

देशाच्या तिजोरीत जमा होणाऱ्या एकूण महसुलापैकी २० ते २५ टक्के महसूल एकट्या मुंबईतून जमा केला जातो. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने या शहराचं महत्त्व टिकवून ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी मुंबई तसंच मुंबईसारख्या देशातील इतर शहरांसाठी देखील वेगळं आर्थिक पॅकेज दिलं पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती. 

हेही वाचा लाॅकडाऊनचा चौथा टप्पा १८ मे पासून, देशाला २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज - पंतप्रधान

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा