कोरोनाविरोधातील लढ्यात सचिनही, ऑक्सिजनसाठी १ कोटींची मदत

देशात रोज ३ लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. त्यामुळे बेड, औषध आणि ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासत आहे. अनेक रुग्णांना तर ऑक्सिजनअभावी जीव गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत भारतासाठी अनेक देश-विदेशातील दिग्गजांनी मदतीचा हात पुढं केला आहे. आता क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकरही कोरोनाविरोधातील लढ्यात मैदानात उतरला आहे. सचिनने मिशन ऑक्सिजनसाठी  एक कोटी रुपयांची मदत केली आहे.

सचिनने २५० उद्योजक तरुणांनी सुरू केलेल्या या मोहिमेत सहभाग घेतला आहे. त्याने या मोहिमेसाठी १ कोटी रुपयांची मदत केली आहे.  मिशन ऑक्सिजन मोहिमेसाठी मदत करत असल्याची माहिती सचिनने ट्विटरद्वारे दिली आहे. सचिनने म्हटलं की, मी खेळत असताना तुमच्याकडून मिळालेला पाठिंबा अमूल्य होता. त्यामुळे मी यश मिळवू शकलो. आज आपण कोरोनाविरोधात लढणाऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहण्याची आणि त्यांना पाठिंबा देण्याची वेळ आहे.

सचिनने  गेल्या वर्षीही मदत केली होती. तेव्हा त्याने पंतप्रधान सहाय्यता निधी आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी दिला होता.



हेही वाचा

जुलै-ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता?

गर्दी टाळा, लसीकरणाचा मेसेज आल्यावरच घराबाहेर पडा, महापौरांचं मुंबईकरांना आवाहन

पुढील बातमी
इतर बातम्या