Advertisement

गर्दी टाळा, लसीकरणाचा मेसेज आल्यावरच घराबाहेर पडा, महापौरांचं मुंबईकरांना आवाहन

मुंबईकरांनी लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये. कोविन अॅपवर नोंदणी झाल्यानंतर लसीकरण केंद्राकडून आलेला मेसेज आणि लसीच्या उपलब्धतेची खात्री केल्यानंतरच घराबाहेर पडा, असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.

गर्दी टाळा, लसीकरणाचा मेसेज आल्यावरच घराबाहेर पडा, महापौरांचं मुंबईकरांना आवाहन
SHARES

कोरोना प्रतिबंधक लशींच्या तुटवड्यामुळे पुढील ३ दिवसांसाठी मुंबई महापालिकेतर्फे करण्यात येणारं मुंबईतील (mumbai) लसीकरण बंद ठेवण्यात आलं आहे. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर देखील जेव्हा लसीकरणाला सुरूवात होईल, तेव्हा मुंबईकरांनी लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये. कोविन अॅपवर नोंदणी झाल्यानंतर लसीकरण केंद्राकडून आलेला मेसेज आणि लसीच्या उपलब्धतेची खात्री केल्यानंतरच घराबाहेर पडा, असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. 

गोरेगाव येथील नेस्को लसीकरण केंद्राला भेट दिल्यानंतर महापौर प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी किशोरी पेडणेकर म्हणाल्या, महापालिकेकडे (bmc) कोरोना लसीचा पुरेसा साठा नसल्याने सद्यस्थितीत १५ मे २०२१ पर्यंत लसीकरणाचा दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस मिळण्याची शक्यता कमी आहे. राज्य शासनाकडून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाची तारीख जाहीर झाल्यानंतरच याबाबतचं नियोजन करण्यात येईल.  

हेही वाचा- मुंबईत पुढील ३ दिवस लसीकरण बंद, महापालिकेची माहिती

लसीकरण केंद्रांबाहेर प्रचंड गर्दी होत असल्याने महापालिका नवीन केंद्र सुरू करण्याबाबत नियोजन करीत आहे. तरी नागरीकांनी पालिकेला सहकार्य करावं. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. ही खबरदारी घेऊनच नागरिकांनी घराबाहेर पडावं. कोविन अॅपद्वारे नोंदणी करून मेसेज आल्यावरच लसीकरण केंद्रावर यावं, जेणकरून गर्दी टाळता येईल, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

दरम्यान, रविवारपर्यंत नवीन पुरवठ्याची तरतूद झाल्यास प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मुंबईकरांना त्याची माहिती दिली जाईल आणि सोमवारपासून पुन्हा लसीकरण सुरू केलं जाईल. नागरिकांनी आधी कोविन अॅपवर नोंदणी करावी आणि दिलेल्या तारखेला केंद्रावर जाऊन लस घ्यावी. नोंदणी केलेल्या आणि दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनाच लसीकरणामध्ये प्राधान्य दिलं जाईल. त्यामुळे इतर नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये, असं आवाहन मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केलं आहे.

(do not rush to bmc covid 19 vaccination centre in mumbai says mayor kishori pednekar )


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा