Advertisement

मुंबईत पुढील ३ दिवस लसीकरण बंद, महापालिकेची माहिती

मुंबईत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा साठा अपुरा असल्याने पुढील ३ दिवस महापालिकेकडून करण्यात येणारं लसीकरण बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

मुंबईत पुढील ३ दिवस लसीकरण बंद, महापालिकेची माहिती
SHARES

मुंबईत (mumbai) कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा साठा अपुरा असल्याने पुढील ३ दिवस महापालिकेकडून करण्यात येणारं लसीकरण बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. सोबतच रविवारपर्यंत लशींच्या नवीन पुरवठ्याची तरतूद झाल्यावर मुंबईकरांना तशी माहिती देण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महापालिकेकडून करण्यात येत असलेल्या लसीकरणाबाबत अधिक माहिती देताना सुरेश काकाणी यांनी सांगितलं की, मुंबईसाठी ७६ हजार डोस मिळाले आहेत. त्यापैकी ५० हजार आज दुपारपर्यंत संपले आहेत. उरलेले दिवसभरात संपतील. मुंबई महापालिकेकडील लशींचा साठा संपत आल्याने पुढचे ३ दिवस लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी लसीकरण केंद्रांवर त्यांनी गर्दी करू नये.  

हेही वाचा- काेरोनाचं संकट राष्ट्रीय आणीबाणी म्हणून जाहीर करा- संजय राऊत

नोंदणीनंतरच लस

मुंबई महापालिकेला (bmc) उद्याच्या उद्या नवा साठा मिळण्याची शक्यता कमीच आहे. रविवारपर्यंत नवीन पुरवठ्याची तरतूद झाल्यास प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मुंबईकरांना त्याची माहिती दिली जाईल आणि सोमवारपासून पुन्हा लसीकरण सुरू केलं जाईल. नागरिकांनी आधी कोविन अॅपवर नोंदणी करावी आणि दिलेल्या तारखेला केंद्रावर जाऊन लस घ्यावी. नोंदणी केलेल्या आणि दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनाच लसीकरणामध्ये प्राधान्य दिलं जाईल. त्यामुळे इतर नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये, असं देखील सुरेश काकाणी यावेळी बोलताना म्हणाले.  

ज्येष्ठांना लस मिळणारच

सोबतच मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी, मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की, कृपया लसीकरण केंद्रांवर गर्दीत किंवा लांब रांगेत उभा राहू नका. सद्यस्थितीत लशींचा अल्प पुरवठा होत आहे आणि त्यामुळे सर्व ठिकाणी पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नाही. पण खात्री बाळगा ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांचे लसीकरण होईल, अशा शब्दांत ज्येष्ठ नागरिकांना आश्वस्त केलं आहे.

हेही वाचा- लोकं लाॅकडाऊनमध्येही घराबाहेर कशी? हायकोर्टाचा सरकारला सवाल

(covid 19 vaccination stop for next 3 day in mumbai from bmc)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा