Advertisement

Lockdown in Maharashtra: राज्यातील लाॅकडाऊन १५ मेपर्यंत वाढवला!

महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती अजूनही आटोक्यात न आल्याने अखेर राज्य सरकारने अपेक्षेनुसार राज्यातील लाॅकडाऊन १५ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय एक दिवस आधीच जाहीर केला आहे.

Lockdown in Maharashtra: राज्यातील लाॅकडाऊन १५ मेपर्यंत वाढवला!
SHARES

महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती अजूनही आटोक्यात न आल्याने अखेर राज्य सरकारने अपेक्षेनुसार राज्यातील लाॅकडाऊन १५ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय एक दिवस आधीच जाहीर केला आहे. त्यानुसार ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध १५ मेपर्यंत लागू असणार आहेत.

राज्यातील कोरोनाची स्थिती आटोक्यात नसल्याने, ठिकठिकाणी अजूनही बेड्स, आॅक्सिजन, औषधांचा तुटवडा जाणवत असल्याने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वच मंत्र्यांनी लाॅकडाऊन वाढवण्यात यावं अशी मागणी केली होती. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यात किमान १५ दिवस किंवा त्याहून जास्त काळासाठी लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो, अशी शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली होती. त्यानुसार राज्य सरकारने गुरूवारी आदेश काढून राज्यात सध्या लागू असलेले निर्बंध १५ मे पर्यंत सकाळी ७ वाजेपर्यंत कायम राहतील असं जाहीर केलं आहे.

महसूल व वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांनी  ‘ब्रेक द चेन’  अंतर्गत साथरोग अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व यापूर्वीच्या आदेशान्वये हे आदेश जारी केले आहेत.दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने देखील एका याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकारला किमान १५ दिवसांचा कडक लाॅकडाऊन लावण्याचे निर्देश दिले होते. सध्या संचारबंदी असूनही लोकं घराबाहेर पडत असल्याने कोरोनाचा संसर्ग कमी होऊ शकलेला नाही. त्यामुळे किमान १५ दिवस कडक लाॅकडाऊन लागू करून अत्यावश्यक कारणांशिवाय लोकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करावा, तेव्हाच काही प्रमाणात तरी संसर्ग आटोक्यात येऊ शकेल, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली होती.

मुंबईत बुधवारी मुंबईत ४ हजार ९६६ नवीन रुग्ण आढळले तर ७८ रूग्णांचा मृत्यू झाला. बुधवारी ५३०० रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोना रुग्णांचा एकूण आकडा ६४०५०७ इतका झाला आहे. तर एकूण १२९९० मृत्यू झाले आहेत. याशिवाय  ५६०४० रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण ५३४१६२५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. बुधवारी ३९१३५ चाचण्या करण्यात आल्या.

सध्या मुंबईत ६५ हजार ५८९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. रूग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ८७ टक्के इतका झाला आहे. तर डबलिंग रेट हा ७४ दिवसांवर गेला आहे.


हेही वाचा-

लोकं लाॅकडाऊनमध्येही घराबाहेर कशी? हायकोर्टाचा सरकारला सवाल

मुंबईत पुढील ३ दिवस लसीकरण बंद, महापालिकेची माहिती


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा