Advertisement

“राज्यात लाॅकडाऊन किती वाढणार, हे ३० एप्रिललाच कळेल”

महाराष्ट्रातील लाॅकडाऊन १५ दिवसांसाठी वाढवण्यात येईल की ३० दिवसांसाठी हे ३० एप्रिल राेजीच कळेल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

“राज्यात लाॅकडाऊन किती वाढणार, हे ३० एप्रिललाच कळेल”
SHARES

राज्यापुढील कोरोनाचं संकट अजूनही कायम असल्याने मंत्रिमंडळ बैठकीत बहुतांश मंत्र्यांनी राज्यातील लाॅकडाऊन वाढवण्याच्या बाजूनेच मत व्यक्त केलं. परंतु हे लाॅकडाऊन १५ दिवसांसाठी वाढवण्यात येईल की ३० दिवसांसाठी हे ३० एप्रिल राेजीच कळेल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिली.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी लाॅकडाऊनसंदर्भातही माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, मंत्रिमंडळ बैठकीत लाॅकडाऊनवरही चर्चा करण्यात आली. राज्यातील कोरोनाची स्थिती अजूनही आटोक्यात आलेली नाही. प्रत्येक जिल्ह्यात दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधितांची नोंद होतच आहे. अशा स्थितीत लाॅकडाऊन मागे घेण्याऐवजी तो वाढवण्यातच यावा, असंच मत बहुतांश मंत्र्यांनी नोंदवलेलं आहे. लाॅकडाऊन वाढवावं, अशीच परिस्थिती राज्यात आहे. त्यानुसार लॉकडाऊनमध्ये नक्कीच वाढ होणार आहे. फक्त एवढंच की ही वाढ किमान १५ दिवसांची असेल की ३० दिवसांची असेल हे ३० एप्रिल रोजीच समजेल, असं राजेश टोपे म्हणाले. 

हेही वाचा- १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत लस, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

महाराष्ट्रातील (maharashtra) लाॅकडाऊनचा कालावधी संपायला २ दिवस उरलेले आहेत. १ मे सायंकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात कडक लॉकडाऊन लागू आहे. या लाॅकडाऊन अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. भाजीपाला, खाद्यपदार्थांच्या दुकानांना सकाळी ७ ते ११ अशी केवळ ४ तासच सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. सार्वजनिक वाहनांतून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. तातडीच्या वैद्यकीय कारणांशिवाय सर्वसामान्यांना जिल्हाबंदीही करण्यात आलेली आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.  

या कडक निर्बंधांनंतरही राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आलेली नाही. बेड्स, आॅक्सिजन, औषधांचा तुटवडा अजूनही जाणवतच आहे. राज्यातील आरोग्य सुविधांवर कमालिचा ताण आलेला आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास आपली आराेग्ययंत्रणा कोलमडून पडू शकते. ती वेळ येऊ द्यायची नसेल, आणखी रुग्ण वाढणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे, म्हणूनच लाॅकडाऊन वाढला पाहिजे, असं बहुतेक मंत्र्यांचं मत आहे. 

हेही वाचा- महाराष्ट्रात १ मेपासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू होणार नाही!

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा