Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

महाराष्ट्रात १ मेपासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू होणार नाही!

येत्या १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण महाराष्ट्रात सुरू होणार नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

SHARES

महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांचं मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असला तरी, येत्या १ मे पासून या वयोगटातील नागरिकांचं लसीकरण महाराष्ट्रात सुरू होणार नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर ते बोलत होते.

प्रसारमाध्यमांना माहिती देताना राजेश टोपे यांनी सांगितलं की, सध्याच्या स्थितीत लसीचे पुरेसे डोस उपलब्ध होत नसल्याने ४५ वर्षांपुढील नागरिकांच्याच लसीकरणात अडथळे येत आहेत. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक लसीकरण केंद्र लस नसल्याने बंद ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे भलेही १ मे पासून १८ वर्षांवरील वयोगटासाठी लसीकरण खुलं होत असलं, तरी महाराष्ट्रात लशींच्या तुटवड्यामुळे तूर्तास तरी त्याची अंमलबजावणी होणार नाही. त्यामुळे १८ - ४४ वयोगटातील लोकांना विनंती आहे की त्यांनी थोडं संयमाने घ्यावं. कारण मे अखेरपर्यंत जरी लसीचे डोस उपलब्ध झाले तरी ते अचानकपणे सर्वांना देता येणार नाही.

हेही वाचा- १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत लस, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

महाराष्ट्रात १८ - ४४ वयोगटातील ५ कोटी ७१ लाख जनता आहे. या सगळ्यांचं एकाचवेळेस लसीकरण करणं लसींच्या पुरेशा साठ्याअभावी शक्य नाही. त्यामुळे वरीष्ठ मंत्र्यांची एक समिती नेमून लसीकरणाचं नियोजन करणार आहे. सर्वात आधी ३५ ते ४४ हा वयोगट घेता येईल का? याची चाचपणी सुरू आहे. यातले सहव्याधीचे रुग्ण आधी घेता येतील का? यावर देखील विचार सुरू आहे. अशा रितीने ही १८ ते २५, २५ ते ३५ आणि ३५ ते ४४ अशा वर्गवारीनुसार लस देण्याचा विचार सुरू आहे. १८ ते ४४ वयोगटासाठीचे लसीकरण केंद्र वेगळे आणि ४५ वर्षांपुढील वयोगटासाठी वेगळे केंद्र असतील, अशी माहिती देखील राजेश टोपे यांनी यावेळी दिली.  

दरम्यान, महाराष्ट्रातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी घेण्यात आला आहे. राज्य सरकारकडून याबाबत अधिकृतरित्या घोषणा करण्यात आल्याने लसीकरणाबाबतचा गोंधळ दूर होणार आहे. 

राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्यात येणार आहे. लसीकरण कार्यक्रमाबाबत नागरिकांना व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.

(covid 19 vaccination will not start in maharashtra for 18 to 44 age group says rajesh tope)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा