महाराष्ट्रातही कोल्ड्रिफ सिरपच्या विक्रीवर बंदी

मध्य प्रदेशात एका मुलाचा कफ सिरपमुळे मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी नवीन महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.

त्यानंतर, अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) या कफ सिरपवर बंदी घातली आहे. चाचणी निकाल येईपर्यंत विक्री थांबवण्यात आली आहे

नागपूर (nagpur) एफडीएने सरकारी रुग्णालयांची तपासणी केली तेव्हा असे आढळून आले की या सिरपचा (cough syrup) पुरवठा करण्यात आला नव्हता.

तथापि, एका खाजगी औषध विक्रेत्याकडे या कंपनीच्या सिरपचा  साठा असल्याचे आढळून आले. या सिरपचे नमुने आता चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. चाचणी निकाल येईपर्यंत या सिरपची विक्री थांबवण्याचे (ban) निर्देश देण्यात आले आहेत.

या संदर्भात, एफडीएने एक निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, "महाराष्ट्र (maharashtra) अन्न आणि औषध प्रशासनाला मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काही मुलांच्या दुर्दैवी मृत्यूची माहिती मिळाली आहे.

या घटना कोल्ड्रिफ सिरपशी (Coldrif Syrup)(फेनिलेफ्राइन हायड्रोक्लोराइड, क्लोरफेनिरामाइन मॅलेट सिरप) संबंधित आहेत.

बॅच क्रमांक एसआर-13, उत्पादन तारीख: मे 2025, कालबाह्यता तारीख: एप्रिल 2027. हे औषध स्रेसन फार्मा, सनगुवरचाथिराम, कांचीपुरम जिल्हा, तामिळनाडू यांनी उत्पादित केले आहे.

या सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल (डीईजी) या विषारी पदार्थाची भेसळ असू शकते. हे लक्षात घेता, सर्व परवानाधारक औषध विक्रेत्यांना आणि सामान्य जनतेला कोल्ड्रिफ सिरप (बॅच क्रमांक एसआर-13) ची विक्री, वितरण किंवा वापर त्वरित थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जर कोणाकडे हे औषध स्टॉकमध्ये असेल तर कृपया स्थानिक औषध नियंत्रण प्राधिकरणाला तात्काळ कळवा. सामान्य जनतेनेही जर त्यांच्याकडे हे औषध स्टॉकमध्ये असेल तर महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाला कळवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, 2 वर्षांखालील मुलांना खोकला आणि सर्दी या आजारांसाठी शक्यतो कोणतेही औषध देऊ नये. कारण मुलांमध्ये बहुतेक गंभीर खोकला आणि सर्दी आजार स्वतःहून बरे होतात आणि त्यांना औषधांची आवश्यकता नसते.


हेही वाचा

मीरा-भाईंदर ते नायगाव मेट्रो प्रकल्पाच्या निविदेला विलंब

मुंबईत ट्रॅफिक सिग्नल्सवर बीपर्स बसवणार

पुढील बातमी
इतर बातम्या