नाकावाटेही दिली जाऊ शकते कोरोना लस, सीरमकडून ट्रायलला सुरुवात

भारतात तयार होणाऱ्या कोरोना लसीसंदर्भात सगळ्यांना आतुरता आहे. भारतात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युमार्फत कोरोना लस पुरवण्यात येणार आहे. ऑक्सफर्डसोबत सीरम इन्स्टिट्युनं करार केला आहे. त्यानुसार ऑक्सफर्डच्या कोरोना लशीचं क्लिनिकल ट्रायल सुरू आहे.

सीरम इन्स्टिट्युमध्ये तयार होणारी ही लस इंजेक्शनमार्फत दिली जाते. मात्र आता भारतात फक्त इंजेक्शनमार्फतच नाही तर नाकावाटेही कोरोना लस दिली जाणार आहे. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने Nasal corona vaccince चं उत्पादन सुरू केलं आहे.

प्री क्लिनिक ट्रायल म्हणजेच या लसीची प्राण्यांवर चाचणी घेण्यात आली. ज्याचा परिणाम सकारात्मक आला आहे. ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. मानवी चाचणी म्हणजेच क्लिनिक चाचण्या सुरू होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील चाचणीला यूकेमध्ये सुरुवात केली जाणार आहे. २०२० च्या अखेर हे ट्रायल सुरू होईल, अशी माहिती समोर आली आहे.

अमेरिकेच्या कोडाजेन्सिक्स (Codagenix Inc.) या कंपनीने नाकावाटे दिली जाणारी कोरोना लस तयार केली आहे. CDX-005 असं या लशीचं नाव आहे. या लशीत पुण्याच्या सीरम संस्थेची भागीदारी आहे. या लशीच्या प्री-क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्या असून आता लवकरच क्लिनिल चाचण्या होणार आहेत. सीरम इन्स्टिट्युटला या लशीचं भारतात उत्पादन घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

कोडाजेन्सिक्स कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, कोरोना लशीचं भारतात उत्पादनाला सीरम इन्स्टिट्युटला परवानगी मिळाली आहे. भारताच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या (DBT - India's Department of Biotechnology) रिव्ह्यु कमिटी ऑफ जेनेटिक मॅनिप्युलेशनने (RCGM - Review Committee on Genetic Manipulation) ही परवानगी दिली आहे.


हेही वाचा

ऑक्सिजन मशीनच्या भाड्यात वाढ, ऑल फूड अँड ड्रग्ज असोसिएशनचा निषेध

लक्षणं नसलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्याचे पालिकेचे निर्देश, 'हे' आहे कारण

पुढील बातमी
इतर बातम्या