Advertisement

मुंबईत ३३ लाख नागरिक कंटेन्मेंट झोनमध्ये

मागील महिन्यात रुग्णांची संख्या घटली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढण्यास सुरूवात झाली. रुग्ण सापडलेल्या अनेक इमारती आणि विभाग सील करण्यात आले आहेत.

मुंबईत ३३ लाख नागरिक कंटेन्मेंट झोनमध्ये
SHARES

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मुबई महापालिका प्रशासन रात्रंदिवस प्रयत्न करत आहे. मागील महिन्यात रुग्णांची संख्या घटली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढण्यास सुरूवात झाली. रुग्ण सापडलेल्या अनेक इमारती आणि विभाग सील करण्यात आले आहेत. सध्या मुंबईतील ३३ लाखांहून अधिक नागरिक कंटेन्मेंट झोनमध्ये आहेत. 

मुंबईत सध्या कंटेन्मेंट झोनची संख्या ६११ आहे. यामध्ये ७ लाख ८ हजार घरांचा समावेश आहे.  कंटेन्मेंट झोनमध्ये ३३ लाख ९ हजारांहून अधिक लोक आहेत. मागील सहा महिन्यात आतापर्यंत १०४८ कंटेन्मेंट झोन शिथिल करण्यात आले आहेत. तर २५,९४८ इमारती या कंटेन्मेंट झोनमधून वगळण्यात आल्या आहेत.

मुंबईतील २४ विभागांपैकी आर मध्य मध्ये १,३३५ तर आर दक्षिण मध्ये १,०१० इमारती सील कऱण्यात आल्या आहेत. तर ६ विभागात प्रत्येकी ५०० हून अधिक इमारती सील करण्यात आल्या आहेत. ई विभागात सर्वात कमी ३७ इमारती सील आहेत.

मुंबईत कोरोना रुग्णांची एकूण संख्या १,८४,३१३ वर गेली आहे. सध्या २७,६६४ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत. त्यात १८३७५ लक्षणे विरहीत रूग्ण असून ७९६६ रूग्णांना लक्षणे जाणवत आहेत. तर १३२३ रूग्ण गंभीर आहेत. आतापर्यंत १ लाख ४७ हजार ८०७ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ८४६६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. हेही वाचा -

लक्षणं नसलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्याचे पालिकेचे निर्देश, 'हे' आहे कारण

नवी मुंबईत महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत ५० टक्के वाढRead this story in हिंदी
संबंधित विषय