उच्च वस्तीत राहणाऱ्यापेक्षा झोपडपट्टीवासियांमध्ये अधिक अँटिबॉडिज

बृहन्मुंबई महानगरपालिके (BMC)च्या आरोग्य विभागाच्या पथकानं मुंबईच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील डॉक्टरांसह खासगी आणि सार्वजनिक प्रयोगशाळांद्वारे घेतलेल्या नमुन्यांमधून शहरातील रहिवाशांचे एक सेरोलॉजिकल सर्वेक्षण केले. प्रशासकिय संस्थेनं या सेरोलॉजिकल सर्व्हेसाठी खासगी लॅबकडून ६००० आणि सार्वजनिक लॅबमधून ६००० नमुने गोळा केले.

या सर्वेक्षणातील निष्कर्षांवरून असं दिसून आलं आहे की, सार्वजनिक प्रयोगशाळांमधून गोळा केलेल्या सुमारे ४६ टक्के नमुन्यांमध्ये COVID 19 चे अँटीबॉडीज होते. दुसरीकडे, खासगी प्रयोगशाळांमधून गोळा केलेल्या नमुन्यांपैकी केवळ २२ टक्के नमुनांमध्ये अँन्टीबॉडीज आहेत.

यावरून हे स्पष्ट होते की, झोपडपट्टीत राहणाऱ्या खालच्या किंवा मध्यमवर्गीय रहिवाशांना कोरोना झाला आणि त्यामुळे अँटीबॉडीज तयार झाल्या. तथापि, अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, अद्याप यासाठी प्रतिकारशक्ती तयार झाली असं म्हणता येणार नाही. कारण कमीतकमी ७० टक्के लोकांना या रोगापासून प्रतिरक्षित ठेवण्याची आवश्यकता आहे.

सार्वजनिक प्रयोगशाळांमधील COVID 19 च्या चाचण्या विनामूल्य असतात. ज्याचा अर्थ मध्यम-वर्ग आणि निम्न-उत्पन्न नागरिकांना इथं त्यांच्या चाचण्या केल्या जातात.

एका खाजगी प्रयोगशाळेत कोविड १९ चाचणीसाठी पैसे आकारले जातात. त्यामुळे खाजगी प्रयोगशाळा रहिवाशांच्या आवाक्याबाहेर असते. या आकडेवारीवरून अधिका-यांनी असा निष्कर्ष काढला आहे की, झोपडपट्टी वसाहतीमधील रहिवाशांची उच्च वस्तीत राहणाऱ्यांपेक्षा प्रतिकारशक्ती जास्त आहे.

अतिरिक्त स्तरावर असलेले आयुक्त सुरेश काकाणी यांनी “मिड-डे'शी बोलताना सांगितलं की,“ आम्ही आमच्या स्तरावर सर्वेक्षण केलं. त्यात असं आढळलं आहे की, सार्वजनिक प्रयोगशाळांमधून संकलित केलेल्या ४६ टक्के नमुन्यांमधील २२ जणांमध्ये अँन्टीबॉडीज आहेत. या सर्वेतून आम्ही योग्य दिशेने वाटचाल करीत आहोत हे कळतं. तथापि, झोपडपट्टी लोकसंख्या असलेल्या सर्व प्रभागांनाही सतर्क ठेवून जागरूकता पसरवली आहे.”


हेही वाचा

कल्याण डोंबिवलीतील खाद्यपदार्थांचे स्टॉल, दुकानं 'या' वेळेत बंद होणार

रेमडेसिवीर इंजेक्शनची किंमत १५०० पर्यंत कमी होण्याची शक्यता

पुढील बातमी
इतर बातम्या