Advertisement

परिस्थिती सुधारली नाही तर..., मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला लाॅकडाऊनचा इशारा

परिस्थिती न सुधारल्यास नाईलाजाने कडक लाॅकडाऊन लावावा लागेल, असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिला.

परिस्थिती सुधारली नाही तर..., मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला लाॅकडाऊनचा इशारा
SHARES

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचे आकडे सातत्याने वाढतच चालले आहेत. दररोज १० हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाची चिंता वाढत चालली आहे. परिस्थिती न सुधारल्यास नाईलाजाने कडक लाॅकडाऊन लावावा लागेल, असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी जनतेला दिला.

उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी सकाळी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लस घेतली. त्यांच्या सोबतच पत्नी रश्मी ठाकरे, त्यांच्या मातोश्री मीनाताई पाटणकर तसंच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी देखील लस घेतली. यावेळी मंत्री आदित्य ठाकरे, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी उपस्थित होते.

हेही वाचा- मुंबईतील खासगी रुग्णालयांत २४ तास लसीकरण

यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मी स्वतः लस घेतली आहे आणि तुमच्यासमोर उभा आहे. मनापासून सांगतो, की लस घेताना कळतसुद्धा नाही एवढ्या छान पद्धतीनं लस दिली जात आहे. कोरोनाचा धोका वाढत आहे. लस घेण्यात कोणतीही भीती नाही. कोरोनावरील धोका वाढतो आहे. कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस आल्यामुळे या रोगापासून आपणास संरक्षण मिळणार आहे. या लसीचे काही दुष्परिणाम नाहीत. म्हणून मी जनतेला आवाहन करतो, ज्यांना ज्यांना लस घेण्यासाठी पात्र ठरवलेलं आहे, त्यांनी मनात कोणतेही किंतु-परंतु न आणता लस घ्यावी.

लस हे संरक्षण असले तरी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, हात धूत राहणं आणि सुरक्षित अंतर ठेवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. काही दिवसांपासून संसर्गात मोठी वाढ होत असून परिस्थिती सुधारली नाही तर आवश्यकतेनुसार काही ठिकाणी नाईलाजाने कडक लॉकडाऊन लावावा लागेल. येत्या एक ते दोन दिवसांत आम्ही याबाबत निर्णय घेणार आहोत, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

(maharashtra cm uddhav thackeray warns on lockdown after increase in covid 19 patients)

हेही वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा