Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस
SHARES

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात त्यांनी कोरोनाचा लसीचा पहिला डोस घेतला आहे. देशभरात गेल्या १ मार्चपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी कोरोना लस घेतली. यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कुटुंबासह कोविशिल्ड लस घेतली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब जे. जे. रुग्णालयात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, रश्मी ठाकरे मातोश्री आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

लस टोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांना जवळपास अर्धा तास रुग्णालयातच देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. शिवाय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींनी कोरोनाची लस घेतली. यांनीही जे. जे. रुग्णालयात लस घेतली. तसेच, उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनीही यावेळी कोरोनाची लस घेतली. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात ज्येष्ठ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत कोरोना लस घेतली.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील मुख्यमंत्र्यांसोबत जे. जे. रुग्णालयात पोहोचले. मात्र, यावेळी त्यांनी कोरोनाची लस घेतली नाही. कोरोना लसीबाबत भीती किंवा संभ्रम ठेवण्याचं कारण नाही. लस घेताना कळत नाहीत. कोरोनाचा धोका परत वाढतो. त्यामुळे जे कोणी कोरोना लस घेण्यासाठी पात्र आहेत, त्यांनी लस घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले. कदाचित काही दिवसांमध्ये काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल. लसीकरण करुन घ्या. बाहेरचं अनावश्यक जाणं टाळा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा