Advertisement

रेमडेसिवीर इंजेक्शनची किंमत १५०० पर्यंत कमी होण्याची शक्यता

कोरोनाबाधित रुग्णांवर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शन या औषधाची घाऊक व किरकोळ विक्री किमतीत प्रचंड तफावत आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनची किंमत १५०० पर्यंत कमी होण्याची शक्यता
SHARES

कोरोनाबाधित रुग्णांवर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शन या औषधाची घाऊक व किरकोळ विक्री किमतीत प्रचंड तफावत आहे. त्यामुळे केंद्र सरकारला या औषधाची किंमत नियंत्रीत करण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने विनंती करण्यात आली आहे. सोबतच शासनाने रुग्णालयांना सदर रेमडेसिवीर इंजेक्शनच्या खरेदी किंमतीवर जास्तीत जास्त ३०% अधिक किंमत आकारण्याबाबत निर्देश देण्याबाबत प्रस्तावित करण्यात आलं आहे. यामुळे या इंजेक्शनची किंमत १५०० पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.

कोरोनाबाधित (coronavirus) रुग्णांवरील उपचारासाठी बऱ्याच औषधांचा वापर होत असून प्रामुख्याने रेमडेसिवीर इंजेक्शन हे औषध या आजारावर प्रभावी असल्याचं आढळून आलं आहे. राज्यात जानेवारी, २०२१ अखेर पर्यंत कोविड रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाल्याचं दिसून आलं. त्याचबरोबर रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी देखील कमी झाली. फेब्रुवारी, २०२१ पासून रुग्णालये व रुग्णालयांना पुरवठा करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांना या औषधाची विक्री किंमत कमी करण्यात आली. परंतू छापील विक्री किंमत कमी करण्यात आली नाही. त्यामुळे ही विक्री किंमत कमी करण्यात आलेल्या किमतीचा लाभ रुग्णांना न मिळता छापील विक्री किमतीनुसार आकारणी होत असल्याने ग्राहकांना आर्थिक भुर्दंड पडत आहे.

याबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी या प्रकरणी कार्यवाही करण्याच्या दिलेल्या सुचनेनुसार अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उत्पादकांनी सदर औषधाची विक्री रुग्णालयांना तसेच रुग्णालयांना पुरवठा करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांना सुमारे ८०० ते १,३०० रुपयांनी म्हणजे सरासरी १०४०/- रुपये किंमतीत केल्याचं आढळून आलं.

हेही वाचा- परिस्थिती सुधारली नाही तर..., मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला लाॅकडाऊनचा इशारा

तथापी याबबत रुग्णालयांनी रुग्णांना आकारलेल्या किंमतीबाबत पडताळणी केली असता काही रुग्णालये त्यांच्या खरेदी किमतीवर १० ते ३० % अधिक रक्कम आकारून छापील किमतीपेक्षा कमी किमतीत रुग्णास उपलब्ध करीत असल्याचं परंतु बहुतांश रुग्णालये खरेदी किंमत कमी असूनदेखील छापील किंमत आकारून मोठ्या प्रमाणावर नफा कमावत असल्याचं दिसून आलं आहे.

त्यामुळे याबाबत अन्न व औषध प्रशासन आयुक्त यांनी याबाबत दखल घेवून रेमडेसिवीर इंजेक्शनची उत्पादकांची विक्री किंमत व प्रत्यक्षात रुग्णांना आकारण्यात येणारी किंमत यामधील तफावत कमी करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यास सुरुवात केली. यासंदर्भात सदर रेमडेसिवीर इंजेक्शन उत्पादित करणाऱ्या उत्पादकांची ६/३/२०२१ व ९/३/२०२१ रोजी अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या उपस्थितीत बैठका घेण्यात आल्या व रुग्णालयांची देखील ८/३/२०२१ रोजी बैठक घेण्यात आली. याबाबतचा प्रशासनाने शासनास सविस्तर अहवाल सादर केला असून शासनाने रुग्णालयांना सदर रेमडेसिवीर इंजेक्शनच्या खरेदी किंमतीवर जास्तीत जास्त ३०% जास्त किंमत आकारण्याबाबत निर्देश देण्याबाबत प्रस्तावित करण्यात आलं आहे. त्यानुसार देण्यात आलेल्या निर्देशानुसार लवकरच रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किंमती कमी होण्याची अपेक्षा आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शन या औषधाची घाऊक व किरकोळ विक्री किमतीतील तफावत बघता व्यापक जनहिताच्या  दृष्टीने  केंद्र शासनाने  औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३ अंतर्गत अधिकाराचा वापर करून रेमडेसिवीर इंजेक्शन 100mg ची अधिकतम किरकोळ विक्री किंमत निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांनी राष्ट्रीय औषध किंमत नियंत्रण प्राधिकरण, नवी दिल्ली यांना सादर केला आहे.

(remdesivir injection price will drop in maharashtra after FDA instructions)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा