महापालिका रुग्णालयांतील युरिन पिशव्यांमध्ये गोंधळ

महापालिका रुग्णालयांतील युरिन बॅगेचा आकार छोटा झाला आहे. २ लिटर युरिनच्या पिशवीऐवजी कंत्राटदारानं दीड लिटरच्या पिशव्या पुरवल्या जात आहेत. मागील ३ महिन्यांपासून वापरात असलेल्या ९० हजार युरिन बॅगची साठवणूक क्षमता कमी असल्याचं निदर्शनास आलं आहे.

पिशव्यांमध्ये गोंधळ

युरिनच्या पिशवीची नळीही ६० ते ६५ सेमी लांब आहे. त्यामुळं पिशवी बेडवरच लावावी लागत आहे. ९० हजार पिशव्यांमध्ये हा गोंधळ झाल्याची माहिती समोर येत आहे. या पिशव्या आकारानं छोट्या असल्यानं संबधित डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. तसंच, या प्रकरणी चौकशीची मागणीही महापालिका प्रशासनाकडं करण्यात आली आहे.

चूक झाल्याचं मान्य

या प्रकरणी पिशव्या पुरवणाऱ्या कंत्राटदारानंही चूक झाल्याचं मान्य केलं आहे. तसंच, कारवाईचा आदेश निघण्यापूर्वी सर्व पालिका रुग्णालयांना नव्यानं पिशव्या देण्याची तयारी दर्शवली आहे. तसंच, या कंत्राटदारानं नजरचुकीमुळं पॅकिंग करताना ही चूक झाल्याचं महापालिकेला दिलेल्या लेखी पत्रात म्हटलं.

कारवाईची मागणी

यावेळी कंत्राटदार कंपनीनं याबाबत महापालिका प्रशासनाकडं प्रश्नही उपस्थित केला. महापालिकेनं सन २०१७मध्ये हे कंत्राट दिलं. त्यानंतर, सन २०१९पर्यंत देण्यात आलेल्या ऑर्डरमध्ये २ हजार मिलीऐवजी २०० मिली असा उल्लेख केला होता. त्यानुसार, मागणीही नोंदवण्यात आली. त्यामुळं जर कंत्राटदारावर ब्लॅकलिस्ट करण्याची कारवाई करण्यात येत असेल, तर तशीच कारवाई महापालिकेच्या संबधित विभागावरही करायला हवी, अशी मागणी कंपनीनं केली आहे. त्यामुळं संपूर्ण प्रकरणाची सहानीशा झाल्यावर महापालिकेच्या संबंधित विभागावर कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा -

एअर इंडियाच्या इंजिनीअरचा गोणीत सापडला मृतदेह

राज्यात भयमुक्त वातावरण निर्माण करू, गृहमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन


पुढील बातमी
इतर बातम्या