मुंबईतील माहीम परिसरात सुटकेसमध्ये मृतदेह मिळाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका व्यक्तीची अशाप्रकारे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घडना घडली आहे. दीपक पांचाळ (५९) असं या व्यक्तिचं नावं असून, अपहरण करून त्यांची गुजरातमध्ये हत्या करण्यात आली आहे. दीपक हे एअर इंडियामध्ये इंजिनीअर म्हणून कार्यरत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तब्बल २ महिन्यांच्या तपासानंतर तिघांना अटक केली आहे.
दीपक पांचाळ याची हत्या करून त्यांचा मृतदेह आरोपींनी गोणीत बांधून गुजरातच्या ब्राह्मणी धरणात टाकला होता. दीपक हे अंधेरी येथील रहिवाशी आहेत. २९ सप्टेंबरपासून ते बेपत्ता होते. पांचाळ यांच्या भावानं ते बेपत्ता असल्याबाबत अंधेरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. बरेच दिवस शोध घेऊनही पोलिसांना पांचाळ यांचा थांगपत्ता लागत नव्हता. त्यांचं अपहरण झाल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केल्यामुळं पोलिसांनी त्यादृष्टीनं तपास सुरू केला.
या प्रकरणी पोलीस चौकशी करत असताना गुजरातच्या हलवद पोलिसांना धरणात मृतदेह असलेली गोणी सापडल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यावेळी पोलिसांनी त्या मृतदेहाची तपासणी केली असता हा मृतदेह पांचाळ यांचाच असल्याचं स्पष्ट झालं.
हेही वाचा -
'या' बँकेमधील ७० खातेदारांचा डेटा लीक, १५ ते २० लाख चोरीला
शरद पवारांनी मला पुनर्जन्म दिला- भुजबळ