शरद पवारांनी मला पुनर्जन्म दिला- भुजबळ

जेव्हा सर्वकाही संपलं असं वाटत होतं, तेव्हा साहेबांनी मला पुनर्जन्म दिला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्याबद्दलच्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

SHARE

जेव्हा सर्वकाही संपलं असं वाटत होतं, तेव्हा साहेबांनी मला पुनर्जन्म दिला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्याबद्दलच्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नरिमन पाॅईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं ‘बळीराजा कृतज्ञता दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी पक्षातील नेत्यांनी पवार यांच्याविषयी मनोगत व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा- हवं तर मला पक्षातून काढा, पंकजा मुंडेंचं पक्षनेतृत्वालाच आव्हान

या कार्यक्रमात बोलताना भुजबळ यांनी सांगितलं की, पवार आपल्या सहकाऱ्यांच्या नेहमीच पाठिशी असतात. माझ्यावर हल्ला झाला त्यावेळी त्यांनी मला सर्वतोपरी मदत केली. आपल्याला लढायचं आहे, घाबरायचं नाही, असं ते मला म्हणाले होते. 

जो प्रश्न आपल्याला समजतही नाही, तो प्रश्न त्यांनी सोडवलेला असतो. लातूर भूकंप, भूज भूकंप या आपत्तींमध्ये संवेदनशील परिस्थिती त्यांनी योग्यरित्या हाताळली. मुंबई साखळी बॉम्बस्फोटांनंतर त्यांनी काही तासांत मुंबई पूर्ववत केली. महाराष्ट्राला आतापर्यंत लाभलेला सर्वात्कृष्ट मुख्यमंत्री शरद पवारच आहेत, अशा शब्दांत भुजबळ यांनी पवार यांच्या कार्याचा गौरव केला. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या