राज्यात भयमुक्त वातावरण निर्माण करू, गृहमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन

महाराष्ट्रातील कुठल्याही समाजघटकाला मोकळेपणाने वावरता येईल, असं वातावरण निर्माण करून राज्य भयमुक्त करू, असं आश्वासन महाविकास आघाडी सरकारमधील नवनियुक्त गृहमंत्री ​एकनाथ शिंदे​​​ यांनी दिलं.

SHARE

महाराष्ट्रातील कुठल्याही समाजघटकाला मोकळेपणाने वावरता येईल, असं वातावरण निर्माण करून राज्य भयमुक्त करू, असं आश्वासन महाविकास आघाडी सरकारमधील नवनियुक्त गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं.

हेही वाचा- शिवसेनेकडे गृह, तर राष्ट्रवादीकडे अर्थ मंत्रालय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाचं खातेवाटप गुरूवारी जाहीर करण्यात आलं. या खातेवाटपानुसार गृहखातं शिवसेनेकडं आलं असून या खात्याची जबाबदारी शिवसेनेचे अनुभवी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिंदे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर खात्यांचं अंतिम वाटप होईल. तोपर्यंत माझ्याकडे गृहखातं असल्याने मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन. त्यादृष्टीने प्रत्येक समाज घटकाला निर्भय वातावरणात वावरता येईल यासाठी जे काही करता येईल ते सर्व करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल.

संबंधित विषय
ताज्या बातम्या