दक्षिण मुंबईतल्या उच्चभ्रू इमारतींमध्ये फोफावतोय कोरोना

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) नुसार, दक्षिण मुंबईतील C वॉर्डमधील तीन इमारतींमध्ये कोरोनव्हायरसच्या घटनांमध्ये गेल्या एका आठवड्यात वाढ झाली आहे.

मुंबई मिरर मधील एका वृत्तानुसार, फनस वाडीतील पाच मजली इमारत असलेल्या जवाहर हवेलीमध्ये कोरोनव्हायरसचे १३ आणि अखिल भारत सीएचएसमध्ये गेल्या आठवड्यात ७ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

भारत महाल नावाच्या आणखी एका इमारतीतही कोविड १९ चे ७ पॉझिटिव्ह रुग्ण नोंदवले गेले. सी वॉर्डात मरीन लाईन्स, काळबादेवी, सीपी टँक, फणस वाडी, कोळीवाडी, चिरा बाजार आणि भुलेश्वर या भागांमध्ये कोविड १९ च्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

दुसरीकडे, वाढती प्रकरणं लक्षात घेता मुंबईच्या प्रशासकिय महामंडळानं पूर्वी जाहीर केलं होतं की, मास्क न घातलेल्या लोकांना सार्वजनिक परिवहन बसेस, टॅक्सी आणि रिक्षांमध्ये प्रवेश मिळणार नाही.

शिवाय, अधिकाऱ्यांनी असंही म्हटलं आहे की, मॉल्स, सोसायटी आणि कार्यालयांमध्ये देखील नो मास्क नो इंन्ट्री हा नियम काटेकोरपणे पाळला गेला पाहिजे. कोरोनाव्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे नियम लागू केले आहेत.

शिवाय, पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ई-बैठकीत अधिकाऱ्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती दिली होती. प्रभाग कार्यालये टॅक्सी आणि ऑटो रिक्षा संघटना तसंच अन्य आस्थापनांच्या व्यवस्थापनासंदर्भात हा निर्णय सांगतील, अशी माहिती देखील अधिकाऱ्यांनी दिली.


हेही वाचा

रेमडेसिवीरचा काळाबाजार झाल्यास…

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत मुंबईतील तब्बल 'इतक्या' नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण

पुढील बातमी
इतर बातम्या