Advertisement

मुंबईच्या झोपडपट्टीत अँटीबॉडीजचं प्रमाण अधिक

मुंबई महापालिकेने अँटॉप हिल वडाळा (एफउत्तर), पश्चिम उपनगरातील दहिसर (आर उत्तर) आणि चेंबूर-टिळक नगर (एम-पश्चिम) या विभागात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात रक्त नमुने घेऊन सेरो सर्वेक्षण केले.

मुंबईच्या झोपडपट्टीत अँटीबॉडीजचं प्रमाण अधिक
SHARES

मुंबईत इमारतींपेक्षा झोपडपट्टींमध्ये अँटीबाॅडीजचं प्रमाण अधिक असल्यांच सेरो सर्वेक्षणातून समोर आलं आहे. मुंबई महापालिकेने अँटॉप हिल वडाळा (एफउत्तर), पश्चिम उपनगरातील दहिसर (आर उत्तर) आणि चेंबूर-टिळक नगर (एम-पश्चिम) या विभागात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात रक्त नमुने घेऊन सेरो सर्वेक्षण केले. 


सेरो सर्वेक्षणात रक्तातील अँटीबॉडीजचे प्राबल्य जाणून घेतले जाते. त्यासाठी रक्ताचे नमुने संकलित केले गेले. कोरोनाचा फैलाव कसा झाला त्याचा अभ्यास करण्यासाठी दोन फेऱ्यांद्वारे सर्वेक्षण करण्याचे निश्चित केले होते. त्या सर्वेक्षणाची पहिली फेरी जुलै महिन्याच्या अखेरीस घेतली गेली. त्यानंतर आता दुसऱ्या फेरीतील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यामध्ये झोपडपट्टी परिसरातील नमुन्यात आढळून अँटीबॉडीजचं प्रमाण अधिक आढळून आले. 

पहिल्या फेरीत ८,८७० पैकी एकूण ६,९३६ नमुने संकलित करण्यात आले होते. झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी परिसर मिळून आर/उत्तर, एम/पश्चिम आणि एफ/उत्तर या ३ विभागांमध्ये सर्वसाधारण लोकसंख्येतून हे नमुने संकलित केले गेले. सर्वेक्षणाच्या दुसऱ्या फेरीत आर/उत्तर, एम/पश्चिम आणि एफ/उत्तर याच तीन विभागात हा सर्वे सप्टेंबर अखेरीस करण्यात आला. या फेरीत ५,३८४ नमुने संकलित केले. हे नमुने संकलित करण्यासाठी ७२८ जणांचा सहभाग होता.

या फेरीतील सर्वेक्षणामध्ये लक्षणे असलेल्या, बरे झालेल्या किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींचा समावेश होता. तसंच संस्थात्माक विलगीकरणात असलेल्या आणि सक्रीय प्रतिबंधात्मक क्षेत्रातील व्यक्तींना या अभ्यासातून वगळण्यात आले. एकूण नमुन्यांपैकी साधारणपणे एक ते दोन टक्के नमुने हे गेल्या फेरीत सहभागी झालेल्या व्यक्तीचेही होते. 

दुसऱ्या फेरीतील सर्वेक्षणात संबंधित तीन विभागांत सर्वेक्षण झाले. त्यानुसार, झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे ४५ टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे १८ टक्के याप्रमाणे रक्तातील अँटीबॉडीजचे प्राबल्य आढळून आले आहे. अँटीबॉडीजचे प्राबल्य हे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये थोडेसे अधिक आढळले आहे.



हेही वाचा -

डॉक्टरांना कामाचे दिवस जास्त आणि क्वारंटाईनसाठी फक्त एक दिवस

अंधेरीतील 'त्या' इमारतीत २२ जणांना कोरोनाचा संसर्ग



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा