केईएम रुग्णालयात विशेष ओपीडी

  • मुंबई लाइव्ह टीम & सोनाली मदने
  • आरोग्य

 सतत पडणाऱ्या पावसामुळे ताप, सर्दी खोकला अशा आजाराने मुंबईकर त्रस्त झाले आहेत. सरकारी रुग्णालयात सध्या या रुग्णांची रांग लागलेली दिसत आहे. त्यामुळे केईएम रुग्णालयात या रुग्णांसाठी विशेष ओपीडी सुरू करण्यात आली आहे.

रुग्ण वाढले

मुसळधार पाऊस आणि पाऊस ओसरल्यानंतर जाणवणारा उकाडा या विषम वातावरणामुळे संसर्गजन्य अाजाराचे रुग्ण वाढले अाहेत.  केईएम रुग्णालयात दररोज ताप, खोकला, सर्दी  अशा संसर्गजन्य अाजारांची लागण झालेले किमान ३० रुग्ण येतात. गेल्या दोन दिवसापासून या रुग्णांची संख्या ४० च्या वर गेली असल्याची माहिती, केईएमचे जनरल प्रॅक्टीशियन डॉ. सुनिल लांबे यांनी दिली.

मागील वर्षीपेक्षा या वर्षी ताप, सर्दी, खोकला असलेल्या रुग्णांमध्ये वाढ झाली अाहे. त्यामुळे अाम्ही केईएम रुग्णालयात बाह्य रुग्णांसाठी ओपीडीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, अशीही माहिती डॉ. लांबे यांनी दिली.


हेही वाचा -

सावधान...देशात वाढत चालला आहे कर्करोग !

ठाणे स्थानकावर पहिली पॅथाॅलॉजी लॅब, २४ तास कार्यरत


 

पुढील बातमी
इतर बातम्या