Advertisement

ठाणे स्थानकावर पहिली पॅथाॅलॉजी लॅब, २४ तास कार्यरत


ठाणे स्थानकावर पहिली पॅथाॅलॉजी लॅब, २४ तास कार्यरत
SHARES

'वन रुपी क्लिनिक' च्या कुर्ला, घाटकोपर, वडाळा, वाशी आणि गोवंडी या रेल्वे स्थानकांवरील क्लिनिकला काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनानं टाळं ठोकलं आहे. २४ तास डॉक्टरांची सुविधा नसल्यानं मध्य रेल्वे प्रशासनानं वनरूपी क्लिनिकला नोटीसा बजावत वरील क्लिनिक बंद केली आहेत. या सर्व संकटावर मात करत पुन्हा एकदा वन रुपी क्लिनिक नव्यानं उभं राहिलं आहे. ठाणे स्थानकात वन रुपी क्लिनिकमध्ये शनिवार ७ जुलैपासून २४ तास कार्यरत असलेली ऑटोमॅटिक पॅथाॅलॉजी लॅब सुरू होणार अाहे.


मानवरहित लॅब

 रेल्वे स्थानकावर असलेली ही पहिलीच पॅथाॅलॉजी लॅब आहे. अन्य पॅथॉलॉजी लॅब या मानवचलित असतात. पण वन रुपी क्लिनीक येथील लॅब ही पुर्णपण मानवरहित असणार आहे. लहान-मोठ्या अशा सहा मशीन २४ तास मुंबईकरांच्या सेवेत राहणार आहेत. या मानवरहित मशीनची किंमत तब्बल १६ ते १७ लाख इतकी आहे.


चाचण्या निम्म्या किमतीत

वन रूप ऑटोमॅटिक लॅबमध्ये ५०० पेक्षा जास्त वैद्यकीय चाचण्या करणं शक्य होणार आहे. यामध्ये रक्त, लघवी, थुंकीसोबतच किडनी यकृत, कर्करोग आणि अन्य रोगांच्या चाचण्या होणार आहेत. या लॅबची खासियत म्हणजे सर्व चाचण्या या अन्य पॅथॉलॉजी लॅबच्या अर्ध्या किमतीत होतील.  म्हणजे एखाद्या चाचणीला अन्य लॅबमध्ये आपण १०० रुपये मोजत असू तर वन रुपी क्लिनीकमध्ये केवळ ५० रुपयातच चाचणी होणार आहे.



भारतीय रेल्वे इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची लॅब उभारण्यात आम्हाला यश आलेलं आहे. वन रुपी क्लिनिकच्या रूपाने आम्ही सर्व नागरिकांना उत्तम वैद्यकीय सुविधा पुरवण्यास नेहमी सज्ज राहू. 

-  डॉ. राहुल घुले, संचालक,  वन रुपी क्लिनिक



हेही वाचा-

अंधेरी पूल दुर्घटना : मनोज मेहता यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

यकृत देऊन 'तिने' ९ महिन्यांच्या बाळाचा वाचवला जीव




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा