अंधेरी पूल दुर्घटना : मनोज मेहता यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

  • मुंबई लाइव्ह टीम & सोनाली मदने
  • आरोग्य

मंगळवार दिनांक ३ जुलै सकाळी साडेसातच्या सुमारास मुंबईतील येथील अंधेरी पूर्व आणि पश्चिम विभागाला जोडणारा गोखले पादचारी पूल हा जमीनदोस्त झाला. यामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. या दुर्घटनेत ५ जण जखमी झाले असून अस्मिता काटकर आणि मनोज मेहता हे दोघे  गंभीर जखमी झाले होते. जुहू येथील कूपर रुग्णालयात अस्मिता यांवर उपचार सुरु असून मनोज मेहता यांच्या पाठीच्या मणक्यावर नानावटी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे.

अस्मिता काटकर कोमात

अंधेरी पूर्व पश्चिम भागाला जोडणारा गोखले पादचारी पूल मंगळवारी रेल्वे ट्रॅकवर कोसळला. सोळा फूट असलेला हा पूल कोसळल्याने पुलावर चालणारे ५ पादचारी जखमी झाले. या दुर्घटनेत व्दारकाप्रसाद शर्मा (४७) यांचा डावा खांदा उजवा पाय आणि दावा पायाचा कोपरा आणि चेहऱ्यावर जखम झाली आहे.  तर गिरीधारी सिंग (४०) यांच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली असून मनगटाला मार लागला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू अाहेत. अस्मिता काटकर (३६) यांना सर्वात जास्त दुखापत झाल्याने कूपर रुग्णालयात त्यांच्या मेंदू, डावा हात आणि गालावर शस्त्रक्रिया झाली आहे. या उपचारादरम्यान अस्मिता कोमामध्ये गेल्या आहेत.

हरीश कोईल यांच्यावरही शस्त्रक्रिया 

५२ वर्षीय मनोज मेहता यांच्या डोक्याला जबर मार बसला असून त्यांच्या डाव्या खांद्याला, छाती आणि कमरेखालील भागालाही इजा झाली आहे . दुर्घटनेनंतर सर्व जखमींना कूपरमध्ये दाखल केले होते. परंतू मनोज मेहता आणि हरीश कोईल या दोघांना नातेवाईकांनी नानावटी रुग्णालयात दाखल केले. मनोज यांच्या पाठीच्या मणक्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे.  परंतु त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे  हरीश कोईल यांच्यावरदेखील शस्त्रक्रिया झाली असून ते त्यांना आता जनरल वार्डमध्ये हलवण्यात आलं आहे.


हेही वाचा -

यकृत देऊन 'तिने' ९ महिन्यांच्या बाळाचा वाचवला जीव

आरोग्य सेविका हक्कासाठी उतरल्या रस्त्यावर


पुढील बातमी
इतर बातम्या